शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

Drought In Marathwada : दुष्काळाच्या छायेने चौकी-धर्मापुरीत घरे कुलुपबंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 8:14 PM

चौकी धर्मापुरी गावातील लोक पोट भरण्यासाठी स्थलांतरित होत आहेत.

ठळक मुद्देशेतकरी आणि भोई बांधवांनी सोडले गावकर्जाचे हप्ते फेडण्यासाठी कर्नाटक, तेलंगणात

- गोविंद शिंदे, बारुळ जि. नांदेड

‘मानार प्रकल्प’ हा  कंधारच नव्हे तर नायगाव, बिलोली, धर्माबाद या तालुक्यासाठी कामधेनू प्रकल्प म्हणून ओळखला जातो़ मात्र मागील तीन वर्षापासून हा प्रकल्प भरला नाही़ प्रकल्पाच्या भरवशावर असलेली २४ हजार हेक्टर बागायती जमीन  आता कोरडवाहू बनली आहे़ तर दुसरीकडे  मत्स्य व्यवसाय करणारे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी कर्नाटक, तेलंणात  स्थलांतर करीत आहेत़  शेतकरी निसर्ग व शासनामुळे हतबल झाला आहे़बारुळ येथील मानार प्रकल्प गेले तीन वर्षांपासून भरला नसल्याने या भागात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे़  प्रकल्पापासून एक कि़मी़ अंतरावरील चौकी धर्मापुरी गावातील लोक पोट भरण्यासाठी स्थलांतरित होत आहेत़   

२२० मजूर ऊसतोड, वीट्टभट्टी, मच्छीमारी, मत्स्य व्यवसाय व इतर कामासाठी कर्नाटक, हैद्राबादकडे कुटुंबासह गेल्याने गावातील गल्ली, गाव ओसाड पडल्यासारखे दिसत आहे़ धर्मापुरी या गावाची कुटुंबसंख्या १२० असून येथील गावातील नागरिकांना शेती कमी आहे़ प्रकल्पाच्या काठावर वसलेल्या या गावाचा रोजगाराचा  हा मच्छमारी आहे़  या प्रकल्पावर २४ हजार हेक्टर जमीन नेहमी बागायती असते़ पण  निसर्गाच्या अवकृपेमुळे ही शेती आता कोरडवाहू बनली आहे़ धर्मापुरीसह तेलर, वरवंट, बारुळ, चिंचोली, बाचोटी, मंगनाळी   आदी गावातील मच्छव्यवसाय करणारे व  शेतकरी कामाच्या शोधात गाव सोडून गेले आहेत़ 

बळीराजा काय म्हणतो?

२२० मजूर परप्रांतातमानार प्रकल्प तीन वर्षांपासून न भरल्याने रोजगारावर उपासमारीची वेळ आली आहे़ रोजगाराने बँकेचे, खाजगी कर्ज घेतल्याने हप्ते फेडण्यासाठी येथील २२० मजूर, शेतकरी कर्नाटक, हैद्राबाद कामाचा शोधसाठी गेले आहेत़    - बालाजी मेकलवाड (सरंपच)

गाव सोडण्याची पाळीहाताला काम नसल्याने माणसे पोटाची खळगी भरण्यासाठी उसतोड, विटभट्टीच्या कामावर गेले आहेत. शासनाकडून रोजगाराची कामे दिल्या जात नाहीत. त्यामुळे  गाव सोडण्याची वेळ आली आहे. -जमुनाबाई डुबूकवाड

हाताला काम द्यावे २० ते २५ गावातील भोई समाजासह इतर समाजही मच्छव्यवसाय करतो़ पण प्रकल्पातील अल्पसाठ्यामुळे आमच्या हाताला काम धंदा नाही़  शासनाने  हाताला काम देण्याची सोय करावी़- मुख्तार शेख (मच्छमारी व्यवसाय)

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र