शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
2
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
5
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
6
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
7
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
9
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
10
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
11
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
12
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
13
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
14
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
15
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
17
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
18
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

पाणीदार गावासाठी भोकर तालुक्यातील ग्रामस्थांचे हात एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 12:37 AM

पाणीदार गाव करण्यासाठी एक नव्हे हजारो हाथ एकवटून श्रमदानाला लागल्याने पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेचा तालुक्यातील ग्रामीण भागातून ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्दे५३ गावांचा सहभाग : वाकद येथे विद्यार्थ्यांची जनजागरणाची प्रभातफेरी

लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : पाणीदार गाव करण्यासाठी एक नव्हे हजारो हाथ एकवटून श्रमदानाला लागल्याने पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेचा तालुक्यातील ग्रामीण भागातून ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत आहे.नाम फाऊंडेशनने सुरु केलेल्या वाटरकप ३ स्पर्धेत तालुक्यातील ५३ गावांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवत स्पर्धा जिंकण्याची जिद्द उराशी बाळगून गाव पाणीदार करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. वर्षानुवर्षाचा दुष्काळ, उन्हाळ्यातील पाण्याचे दुर्भिक्ष, पाण्यासाठी वणवण भटकंती यावर मात करून गाव पाणीदार करण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब शिवारात मुरावा, यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी अंग झटकले आहे. स्पर्धेतील ५३ गावातील प्रतिनिधींना नाम फाऊंडेशनच्या वतीने प्रशिक्षण दिल्या नंतर पाणी बचतीचे तंत्र अवगत करून गावागावात पाणी बचतीच्या चळवळीला सुरवात झाली आहे. सध्या २५ गावात स्पर्धेला प्रत्यक्ष सुरुवात होवून रविवार सुट्टीचा दिवस असूनही तालूक्यातील वाकद, समंदरवाडी, बल्लाळ, सोनारी, मातुळ, कामणगाव या गावातील अबाल वृद्ध सकाळपासून हातात कुदळ,फावडे, टोपले घेऊन श्रमदान करत होते़ केली.सरपंच शारदा वाकदकर, उपसरपंच सोपान माझळकर, तंटामुक्ती अध्यक्ष रघुनाथ वाघमारे, पांडुरंग वाकदकर, शाळेचे मु.अ. एम.पी.भीसे, तलाठी ज्योती राठोड, अंगणवाडी सेविका वंदना वाकदकर, आशा वर्कर उज्वला वाघमारे आदींसह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. पाणीदार गावासाठी पाणी फाऊंडेशन चे जिल्हा समन्वयक बापूसाहेब लुंगेकर,तांत्रिक प्रशिक्षक सत्यप्रेम नरवले, अमोल माने,अमोल गायकवाड परिश्रम घेत आहेत. सूत्रसंचालन सीताराम खंडागळे यांनी केले. तर वनरक्षक गव्हाणे यांनी आभार मानले.तालुक्यातील वाकद येथे संत गाडगेबाबा आश्रम शाळेच्या ९५ विद्यार्थ्यांनी गावातून जनजागरणाची प्रभातफेरी काढली. त्यानंतर गावातील बालक, महिला, वृद्वासह सर्व ग्रामस्थांनी शिवार गाठून श्रमदानातून शेतीचे बांध, दगडी बांध अशी विविध कामे केली. यात महिलांचा, बालकांचा व विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी ग्रामस्थांना पाणी बचतीचे मार्गदर्शन करण्यात आले.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाwater shortageपाणीटंचाई