प्राथमिक आरोग्य केंद्रांना एमबीबीएस डॉक्टर देता का डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:20 IST2021-03-09T04:20:25+5:302021-03-09T04:20:25+5:30
चाैकट- उपकेंद्र बीएएमएस डॉक्टरांच्या हवाली ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सांभाळण्यासाठी नियुक्त केलेल्या एमबीबीएस डॉक्टरांची पदे जवळपास भरण्यात आलेली ...

प्राथमिक आरोग्य केंद्रांना एमबीबीएस डॉक्टर देता का डॉक्टर
चाैकट- उपकेंद्र बीएएमएस डॉक्टरांच्या हवाली
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सांभाळण्यासाठी नियुक्त केलेल्या एमबीबीएस डॉक्टरांची पदे जवळपास भरण्यात आलेली असली तरी काही आरोग्य केंद्रावर डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या ठिकाणी बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. एमबीबीएसची पदे भरण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केल्यानंतरही या मागणीची दखल अद्याप कोणीही घेतली नाही.
चौकट- जिल्ह्यात ६८ प्राथमिक आरोग्य केंद्र असून जवळपास प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस वर्ग १ ची पदे भरण्यात आलेली आहेत. १६० पदे मंजूर असून त्यापैकी १५० पदे भरण्यात आली आहेत. १० पदे रिक्त असून या जागा एमपीएससी द्वारे भरली जातात. ७५टक्के जागा या एमबीबीएसच्या तर २५ टक्के जागा या बीएएमएसच्या भरण्यात येतात. - डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड