शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:04 IST

जिल्ह्यातील विविध कारखान्यांसह ५६ संस्थांकडे जिल्हा बँकेचे तब्बल १९२ कोटी अनुत्पादित कर्ज थकित आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँक आक्रमक झाली असून गोदावरी मानार साखर कारखाना विक्री करण्यासाठी नव्याने निविदा काढण्याचे तर कलंबर सहकारी साखर कारखाना विक्रीच्या स्थगितीबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील विविध कारखान्यांसह ५६ संस्थांकडे जिल्हा बँकेचे तब्बल १९२ कोटी अनुत्पादित कर्ज थकित आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँक आक्रमक झाली असून गोदावरी मानार साखर कारखाना विक्री करण्यासाठी नव्याने निविदा काढण्याचे तर कलंबर सहकारी साखर कारखाना विक्रीच्या स्थगितीबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.ग्रामीण भागाची आर्थिक घडी ही जिल्हा बँकेवर अवलंबून असते. नांदेड जिल्हा बँकेचा ६८ शाखांच्या माध्यमातून कारभार सुरु आहे. मात्र थकित कर्जामुळे बँकेवर मर्यादा आल्या आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यातील ठेवीदारांचा विश्वास पुन्हा संपादित करण्यासाठी तसेच बँकेला गतवैैभव मिळवून देण्यासाठी थकित कर्जाची वसुली करणे आवश्यक आहे. शुक्रवारी नवनिर्वाचित अध्यक्ष दिनकर दहीफळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रामुख्याने याच विषयावर चर्चा झाली. बँकेचे थकित कर्ज १९२ कोटी आहे तर संचित तोटा १३४ कोटी रुपये आहे. अनुत्पादित थकित कर्जाची वसुली केल्यानंतरच हा संचित तोटा कमी होऊ शकतो. २००५ पूर्वी हा संचित तोटा ३६२ कोटींच्या घरात होता. मात्र तो आता १३४ कोटींवर आला आहे. थकित कर्ज वसुलीला गती देवून तो आणखी कमी केल्यास जिल्हा बँक पुन्हा रुळावर येऊ शकते. यामुळे गोदावरी मानार साखर कारखाना विक्री करण्यासाठी नव्याने निविदा काढण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत प्राधान्याने घेण्यात आला. कलंबर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेला मंत्रालयस्तरावरुन स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात दाद मागण्याचा निर्णयही घेण्यात आला. जिल्हा बँकेच्या थकबाकीसंदर्भातील अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. ही प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी बँकेच्या वकिलांची स्वतंत्र बैठक घेण्याचेही या बैठकीत निश्चित करण्यात आले.बैठकीस उपाध्यक्ष डॉ. सुनील कदम, संचालक भास्करराव पाटील खतगावकर, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, गोविंदराव पाटील नागेलीकर, मोहनराव पाटील टाकळीकर यांच्यासह १३ संचालकांची उपस्थिती होती.नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६८ शाखा आहेत. यातील काही शाखा मागील अनेक वर्षांपासून तोट्यात आहेत. या शाखांना ठेवी वाढविण्यासह कर्जाची वसुली करुन आर्थिक पत वाढवावी, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र दिलेल्या मुदतीत या शाखांनी ना ठेवी वाढविल्या ना थकित कर्जाची अपेक्षित वसुली केली. त्यामुळे तोट्यात असलेल्या अशा शाखा पोसायच्या कशाला ? असा प्रश्नही या बैठकीत उपस्थित झाला. यावर तोट्यात असलेल्या ७ शाखा बंद करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.