शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

नांदेड महापालिकेच्या महापौरपदी दीक्षा धबाले यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 12:26 AM

महापालिकेत शनिवारी झालेल्या विशेष सभेत पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची उपस्थिती होती. ११ वाजता सभेला सुरुवात झाली. १५ मिनिटे अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला. कुणीही अर्ज मागे न घेतल्याने मतदान घेण्यात आले.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या धबालेंना ७० तर भाजपाच्या बेबीताई गुपिलेंना ४ मते

नांदेड : नांदेड महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या दीक्षा कपिल धबाले यांची शनिवारी ७० विरुद्ध ४ अशा मतफरकाने निवड झाली. प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाच्या बेबीताई गुपिले यांना केवळ चार मते मिळाली.महापालिकेत शनिवारी झालेल्या विशेष सभेत पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची उपस्थिती होती. ११ वाजता सभेला सुरुवात झाली. १५ मिनिटे अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला. कुणीही अर्ज मागे न घेतल्याने मतदान घेण्यात आले. हात उंचावून झालेल्या या मतदान प्रक्रियेत काँग्रेसच्या दीक्षा धबाले यांना ७० तर भाजपाच्या बेबीताई गुपिले यांना ४ मते मिळाली. धबाले यांनी एकतर्फी विजय मिळविला.महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. ८१ पैकी ७३ नगरसेवक काँग्रेसचे आहेत. भाजपाचे ६, शिवसेना-१ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल महापालिकेत आहे.शनिवारी झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत एकूण सात सदस्य अनुपस्थित राहिले. त्यात काँग्रेसचे चार सदस्य तर भाजपाचे दोन आणि शिवसेनेचा एकमेव सदस्य अनुपस्थित होता. अनुपस्थित सदस्यांमध्ये काँग्रेसच्या दीपाली मोरे, संगीता बिरकले, आयशा बेगम, साबिया बेगम तर भाजपाच्या इंदुबाई घोगरे, दीपकसिंह रावत आणि शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांचा समावेश होता.काँग्रेसच्या निर्णयाप्रमाणे महापालिकेचे महापौरपद हे सव्वा वर्षांसाठी निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार शीलाताई भवरे यांनी २२ मे रोजी राजीनामा दिला. काँग्रेसकडून दीक्षा धबाले यांचा एकमेव अर्ज आला होता तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून बेबिताई गुपिले यांनी अर्ज दाखल केला होता. निवडीनंतर आ. अमरनाथ राजूरकर, आ. डी.पी. सावंत यांच्या उपस्थितीत धबाले यांनी पदभार स्वीकारला.पाणीप्रश्न सोडविण्यास प्राधान्य- दीक्षा धबालेमहापौरपदी निवड झाल्यानंतर महापौर दीक्षा धबाले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आ. अमिता चव्हाण, आ. अमर राजूरकर, आ. सावंत यांनी महापौरपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार व्यक्त केले. शहरात सध्या पाणीटंचाईचा विषय ऐरणीवर आला आहे. हा विषय सोडविण्यास आपले प्राधान्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. शहर स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती त्यासह महापालिकेचे उत्पन्नवाढ यावरही आपण लक्ष केंद्रित करणार असल्याचे धबाले यांनी सांगितले.उपमहापौर विनय गिरडे यांचा राजीनामाकाँग्रेसच्या सव्वा वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार उपमहापौर विनय गिरडे यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. २२ मे रोजी महापौर शीला भवरे यांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी गिरडे यांनी राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे त्यांना मुदतवाढ मिळाल्याची चर्चा झाली. मात्र १ जून रोजी अखेर गिरडे यांचाही काँग्रेस पक्षाने राजीनामा घेतला. आता नवा उपमहापौर कोण? याची चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाMayorमहापौरElectionनिवडणूक