शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

पित्यानंतर पुत्रानेही हरवले ! देगलूर पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2021 4:51 PM

Deglur Bypoll: पिता स्व. रावसाहेब अंतापूरकर आणि त्यांचा पुत्र जितेश यांनी २०१९-विधानसभा आणि त्यानंतर २०२१ ची पोटनिवडणुक अशा लागोपाठ दोन निवडणुकीत सुभाष साबणे यांचा पराभव केला.

नांदेड : पहिल्या फेरीपासून मिळवलेली आघाडी कायम ठेवत कॉंग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकरा यांनी देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. अंतापूरकर यांना ३० व्या फेरी अखेर १ लाख ८ हजार ७८९ मते मिळाली. तर भाजपच्या सुभाष साबणे यांना ६६ हजार ८७२ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावरील वंचितचे डॉ. उत्तम इंगोले यांना ११ हजार ३४७ मते मिळाली. जितेश अंतापूरकर यांनी तब्बल ४१ हजार ९३३ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे जितेश यांच्या विजयी मतांची आघाडी त्यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर यांनी २०१९ विधानसभेच्या आघाडीपेक्षा दुप्पट आहे. 

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळविल्यानंतर महाविकास आघाडीसमोर देगलूर-बिलोली पोटनिवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. पंढरपूर पोटनिवडणुकीचा चमत्कार पुन्हा दिसावा यासाठी शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपने पक्षात घेत थेट निवडणूक रिंगणात उतरवले. तर कॉंग्रेसने स्व. रावसाहेब अंतापूरकर यांचा मुलगा जितेश अंतापूरकर यांना तिकीट दिले. महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्रित लढवली. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांनी या निवडणुकीच्या प्रचाराची सर्वसुत्रे हाती घेत यंत्रणा राबवली. दुरारीकडे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपच्या मातब्बर नेत्यांच्या सभांचे आयोजन करत रंगत वाढवली. वंचित बहुजन आघाडीने डॉ. उत्तम इंगोले यांना उभे केल्याने निवडणुकीत चुरस वाढवली होती. वंचितचे बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर नेत्यांच्या सभांना मिळणाऱ्या प्रतिसादाने कॉंग्रेस-भाजपचे टेन्शन वाढले होते.

या निवडणुकीत ६४.९५ %   इतकं मतदान झाल.  एकूण २ लाख ९८ हजार ५३५ मतदारांपैकी १ लाख ९० हजार ८०० इतकं मतदान झाले होते. एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. मात्र, महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशीच थेट लढत झाली. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने देखील लक्षणीय मते घेतली आहेत. कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी पहिल्या फेरीत १६२४ मतांची आघाडी घेतली. एकूण ३० फेऱ्यात अंतापूरकर यांनी आघाडी टिकवून ठेवत अखेर ४१ हजार ९३३ मतांनी विजय मिळवला.

पिता-पुत्राने केला एकाच उमेदवाराचा पराभव स्व.रावसाहेब अंतापूरकर यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार असलेले सुभाष साबणे यांचा तब्बल २२ हजार ३३० मतांनी पराभव केला होता. रावसाहेब अंतापूरकर यांना ८८ हजार १८१ तर सुभाष साबणे यांना ६५ हजार ८५१ मते मिळाली होती. पोटनिवडणुकीत सुभाष साबणे हे भाजपचे तर स्व. रावसाहेब अंतापूरकर यांचा मुलगा जितेश यांनी महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवली. जितेश यांनी साबणे यांच्यावर तब्बल ४१ हजार ९३३ मतांनी विजय मिळवला. पिता आणि पुत्राने लागोपाठ दोन निवडणुकीत एकाच उमेदवाराचा पराभव केल्याने ही निवडणूक चिरकाळ स्मरणात राहील.

टॅग्स :deglur-acदेगलूरNandedनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी