शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

देगलूर विधानसभेचा सस्पेन्स कायम; कॉँग्रेस-भाजप मतदारसंघाबाबत वेगळा निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 19:26 IST

भाजपा व काँग्रेसकडून अनेक इच्छुकांची तयारी; मात्र दोन्ही पक्षांनी अद्याप उमेदवार जाहीर केला नाही.

- शेख शब्बीरदेगलूर: अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाला तर महायुतीमधून भाजपाला हा मतदारसंघ सुटण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, काँग्रेस तसेच भाजपाकडून जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीमध्ये देखील देगलूर मतदार संघाचा उल्लेख नाही. यामुळे हा मतदार संघ सहयोगी पक्षाला तर सुटणार नाही ना? याबाबत मतदार संघात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

2009 साली अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या या मतदारसंघात एकूण चार वेळा निवडणूका झाल्या. या चारही निवडणुकीत मुख्य लढती काँग्रेस विरुद्ध शिवसेना, काँग्रेस विरुद्ध भाजपा यांच्यामध्ये झाल्या . त्यातच 2021 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजपा होऊन कॉँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. त्यामुळे यावेळी देखील याच दोन पक्षात लढत होईल असे गृहीत धरून भाजपा व काँग्रेसकडून अनेक इच्छुक उमेदवारांनी तयारीही चालविली. 

कॉँग्रेस मित्र पक्षांना जागा सोडणार?विशेष म्हणजे, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देगलूरचे विद्यमान आमदार जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपाचे कमळ हाती घेतलले. त्यामुळे काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी जवळपास 40 इच्छुक उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यातच उमेदवार स्थानिक असावा अशी मागणी पुढे येत असतानाच बौद्ध समाजाने अद्याप मतदारसंघाचे नेतृत्व केले नसल्याने बौद्ध समाज उमेदवारीसाठी आक्रमक झाला आहे. त्यामुळे एकीकडे  इच्छुक उमेदवारांची वाढलेली संख्या तर दुसरीकडे उमेदवारीवरून बौद्ध समाजाची नाराजी ओढवून घेण्याची कटकट नको म्हणून हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी काँग्रेस पक्ष फारसा उत्सुक नसल्याची चर्चा मतदार संघात रंगली आहे. त्यातच काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या व दुसऱ्या यादीत देगलूर विधानसभेचे नाव नसल्यामुळे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना सुटतो की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

देगलूरमध्ये महायुतीचा 'लोहा पॅटर्न'?तर दुसरीकडे काँग्रेस मधून भाजपात गेलेल्या विद्यमान आमदारांचे भाजपाकडून तिकीट फायनल झाल्याचे सांगितले जात होते. त्यादृष्टीने त्यांच्याकडून तयारीही केली जात आहे.मात्र महायुतीतील भाजपाकडून दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या मात्र त्यामध्ये देगलूर विधानसभेचे नाव न आल्यामुळे सस्पेन्स वाढला आहे. तर दुसरीकडे देगलूर मतदार संघ हा महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे सुटला असल्याची चर्चा रंगली आहे.त्यामुळे देगलूर मतदार संघातही लोहा पॅटर्न राबविला जाणार का? भाजपात इच्छुक असलेले आमदार महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून निवडणुकीला सामोरे जातात का? याबाबत मतदार संघात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकdeglur-acदेगलूरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती