Deglaur by-election: देगलूर पोटनिवडणूक: काँग्रेसने दिली जितेश अंतापूरकरांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 11:06 PM2021-10-04T23:06:23+5:302021-10-04T23:08:05+5:30

Deglaur by-election: पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का देण्यात आला होता. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढली होती. तरी देखील भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला होता.

Deglaur by-election: Congress names its candidate for by-election Jitesh Antapurkar | Deglaur by-election: देगलूर पोटनिवडणूक: काँग्रेसने दिली जितेश अंतापूरकरांना उमेदवारी

Deglaur by-election: देगलूर पोटनिवडणूक: काँग्रेसने दिली जितेश अंतापूरकरांना उमेदवारी

googlenewsNext

कोरोनामुळे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या देगलूर मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 30 ऑक्टोबरला ही निवडणूक होणार आहे. भाजपाने मोठी खेळी केली असून शिवसेनेचे माजी आमदार आणि गेल्या वेळचे पराभूत उमेदवार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने नुकतीच जितेश अंतापूरकरांची उमेदवारी जाहीर केली आहे. (Congress gave ticket to Jitesh Antapurkar for Deglaur by-election )

पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का देण्यात आला होता. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढली होती. तरी देखील भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला होता. विद्यमान आमदार, खासदाराचे निधन झाले तर त्याच्या पत्नीला, मुलाला किंवा मुलीला उमेदवारी देण्यात येते. विरोधी पक्ष आणि मतदारांची देखील सहानुभूमी मिळविण्याचा तो एक प्रघात असतो. परंतू पंढरपूरमध्ये भाजपाने उमेदवारी देऊन विजय खेचून आणला होता. तसाच दगाफटका या पोटनिवडणुकीत होणार की काय असा प्रश्न राजकीय धुरिणांना पडला आहे. 



 

सुभाष साबणे यांची बंडखोरी
भाजपने शिवसेनेला मोठा धक्का देत सेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नरसी नायगावमध्ये दाखल झाले होते. देवेंद्र फडणवीस आणि सुभाष साबणे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. 
 

Web Title: Deglaur by-election: Congress names its candidate for by-election Jitesh Antapurkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.