‘राफेल’बद्दलच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 07:02 IST2018-12-14T07:02:27+5:302018-12-14T07:02:52+5:30
राफेल व्यवहाराची चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी निर्णय घेणार आहे.

‘राफेल’बद्दलच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय
नवी दिल्ली : राफेल व्यवहाराची चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी निर्णय घेणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, संजय किशन कौल आणि के. एम. जोसेफ यांच्या पीठाने दाखल याचिकांवर १४ नोव्हेंबर रोजी सुनावणी पूर्ण केली होती. या प्रकरणात कथित अनियमिततेचा आरोप करत वकील मनोहरलाल शर्मा यांनी जनहित याचिका दाखल केली होती.