किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:40 IST2019-12-27T12:38:14+5:302019-12-27T12:40:31+5:30

पिंपळढव बसस्थानकावर दुपारी ४. ३० वाजताच्या दरम्यान क्षुल्लक कारणावरुन वाद

Death of a teenager due to minor dispute in Bhokar | किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू 

किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू 

भोकर  (जि. नांदेड) : तालुक्यातील पिंपळढव येथे दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन झालेल्या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

तालुक्यातील पिंपळढव येथील रहिवासी बालाजी आनंदराव पुण्यबोईनवाड (३०) आणि गावातीलच मारोती (ऊर्फ पिंटू ) देवराव कदम या दोघांमध्ये पिंपळढव बसस्थानकावर दुपारी ४. ३० वाजताच्या दरम्यान क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. यात बालाजी पुण्यबोईनवाड याचा मृत्यू झाला. 

नातेवाईक नागेश निरंजन गानलावाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री उशिरा  मारोती देवराव कदम याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि डेडवाल करीत आहेत. जमादार उमेश कारामुंगे, प्रकाश श्रीरामे, कृष्णा तलवारे, मंगु जाधव यांनी पंचनामा करुन आरोपीस ताब्यात घेतले आहे.  घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस उप अधिक्षक बी. मुदिराज यांनी घटनास्थळी भेट दिली. शेतकरी असलेला बालाजी आनंदराव पुण्यबोईनवाड हा  कुटुंबात एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व अडीच वर्षाची मुलगी आहे.

Web Title: Death of a teenager due to minor dispute in Bhokar