CoronaVirus : चिंताजनक ! नांदेडमध्ये आणखी तीन पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ३८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 10:18 IST2020-05-08T10:17:13+5:302020-05-08T10:18:04+5:30

दोन महिला व एका पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह

CoronaVirus: Worrying! Three more positives in Nanded; total Number of patients 38 | CoronaVirus : चिंताजनक ! नांदेडमध्ये आणखी तीन पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ३८

CoronaVirus : चिंताजनक ! नांदेडमध्ये आणखी तीन पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ३८

ठळक मुद्देएकूण ३१ रुग्णांवर उपचार सुरू

नांदेड- शहरातील अबचल नगर भागातील आणखी तिघांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे, गुरुवारी पाठवलेल्या 23 स्वॅब पैकी दोन महिला व एका पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नांदेडचे रुग्णसंख्या आता 38 वर गेली आहे.

नांदेड शहरात आतापर्यंत चार जणांचा कोरोना मुले मृत्यू झाला आहे. गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील तब्बल 20 जणांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे लंगर साहिब, अबचल नगर, रहमत नगर आणि पिरबुऱ्हाण नगर हे भाग सील केले आहेत. शुक्रवारी सकाळी अबचल नगर येथील दोन महिला आणि रवी नगर येथील पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नांदेडची रुग्णसंख्या आता 38 वर गेली आहे. त्यातील चार जणांचा मृत्यू झाला असून तिघे फरार आहेत, 31 जनावर उपचार सुरू आहेत.

Web Title: CoronaVirus: Worrying! Three more positives in Nanded; total Number of patients 38