शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

CoronaVirus : मराठवाड्यात सर्वाधिक मृत्यूदर नांदेडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 7:52 PM

नांदेडचा मृत्यूदर ५.३८, मुंबईतील मृत्यू दराशी बरोबरी

ठळक मुद्देआठही जिल्ह्यांत कोरोनाचा कहर 

- शिवराज बिचेवार 

नांदेड : मराठवाड्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मराठवाड्यात सर्वाधिक ५.३८ इतका मृत्यूदर नांदेड जिल्ह्याचा असल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे हैराण झालेल्या मुंबईचा मृत्यूदर ५़६८ असून, नांदेड त्याच्या जवळ पोहोचल्याने चिंता वाढली आहे. 

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने शेवटचा उपाय म्हणून आठ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला़; परंतु त्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या पंधरा दिवसांत रुग्ण दुप्पट तर मृत्यू अडीचपटीने वाढले आहेत़  जूनच्या अखेरीस बाधित रुग्णांची संख्या ३६७ होती़ १७ जुलैपर्यंत हा आकडा ७४३ झाला आहे़ जूनच्या अखेरीस जिल्ह्यात १६ जणांचा मृत्यू झाला होता़ आता जुलैच्या मध्यापर्यंत हा आकडा ४३ वर पोहचला आहे़  कोरोना अत्यवस्थ रुग्णांना विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात येते़ या ठिकाणी या रुग्णांवर उपचार होतो़ मृत्यू झालेल्या प्रत्येक रुग्णाला उच्च रक्तदाब, मधूमेह, श्वसनाचा त्रास यासारखे गंभीर आजार असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले आहे़ मृत्यू पावणाऱ्यांमध्ये वयोवृद्धासह तरुण आणि अकरा महिन्यांच्या चिमुरड्याचाही समावेश आहे़ शेजारील हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील अत्यवस्थ रुग्ण नांदेडातच उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. 

मृत्यू कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्नकोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत़ रुग्णालयामध्ये सध्या सर्व प्रकारच्या औषधीसह  इतर आवश्यक साधनांची मुबलक उपलब्धता आहे़ नांदेड येथील रुग्णालयात हिंगोली, परभणी, लातूर यासह इतर भागांतूनही अत्यवस्थ कोरोना रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत़ या रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे़-डॉ़ नीळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, नांदेड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड