'कोव्हिशिल्ड' नावाचा वाद मिटेना; नांदेडच्या कंपनीची सिरमच्या विरोधात पुण्याच्या व्यावसायिक न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 09:40 AM2021-01-06T09:40:26+5:302021-01-06T09:51:23+5:30

The controversy over the name 'Covishield' : नांदेड येथील क्‍युटीस कंपनीकडून दावा दाखल

The controversy over the name 'Covishield' did not end; Nanded-based company runs in Pune commercial court against Siram | 'कोव्हिशिल्ड' नावाचा वाद मिटेना; नांदेडच्या कंपनीची सिरमच्या विरोधात पुण्याच्या व्यावसायिक न्यायालयात धाव

'कोव्हिशिल्ड' नावाचा वाद मिटेना; नांदेडच्या कंपनीची सिरमच्या विरोधात पुण्याच्या व्यावसायिक न्यायालयात धाव

Next
ठळक मुद्दे"कोव्हिशिल्ड' ट्रेडमार्कचा वापर करून मिळवलेला नफा "क्‍युटीस'ला द्यावाकोव्हिशिल्ड' नावाशी मिळते-जुळते नाव "सीरम'ने वापरू नये

नांदेड : कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी येथील "सीरम इन्स्टिट्यूट आफॅ इंडिया' (सिरम) बनवत असलेल्या लशीच्या नावावर नांदेड येथील "क्‍युटीस बायोटीक' या कंपनीने हरकत घेतली होती. त्या अनुषंगाने दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी नांदेड येथील जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्याला सिरमकडून न्यायालयाच्या कार्य क्षेत्रावर आक्षेप घेतला होता व हे प्रकरण फक्त व्यावसायिक न्यायालयात चालू शकते असा युक्तिवाद केला होता. अपेक्षेप्रमाणे क्‍युटीस' बायोटेक हा वाद नांदेडच्या व्यावसायिक न्यायालयात घेऊन जाईल असा अंदाज बांधुन सिरमने नांदेडच्या व्यावसायिक न्यायालयात कावेट टाकून ठेवली होती. परंतु,क्‍युटीस बायोटेकने थेट पुण्याचे न्यायालय गाठले. 

"कोव्हिशिल्ड' या ट्रेडमार्कचा वापर करण्यास आम्ही "सीरम'च्या आधी सुरवात केली आहे. त्यामुळे "सिरम'ने लसीची निर्मीती करावी, मात्र तिचे नाव बदलावे, अशी मागणी करणारा दावा कंपनीने येथील जिल्हा न्यायालयात केला आहे.
"कोव्हिशिल्ड' ला परवानगी देण्यासाठी अर्ज केल्यानंतर "सिरम' "कोव्हिशिल्ड' या ट्रेडमार्कचा वापर करीत असल्याची माहिती "क्‍युटीस'ला मिळाली आहे. आम्ही 29 एप्रिल 2020 रोजी "कोव्हिशिल्ड' हा ट्रेडमार्क मिळण्यासाठी रजिस्टर कार्यालयाकडे अर्ज केला होता. "सिरम'ने त्यानंतर म्हणजे तीन जून 2020 रोजी अर्ज केला आहे. ट्रेडमार्कला अर्ज केल्यानंतर आम्ही कोरोनाशी लढा देण्यासाठी कोविशील्ड नावाने विविध उत्पादने 30 मे पासून बनवायला व त्याची विक्री करण्यास सुरवात केली आहे. हे सर्व उत्पादन "कोव्हिशिल्ड' या ट्रेडमार्कखाली उत्पादित व विक्री केली जात आहेत. मात्र आता "सिरम'ने त्यांची लस "कोव्हिशिल्ड' या नावाने बाजारात आणण्याची तयारी केल्याने ट्रेडर्स आमची उत्पादने घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे कंपनीला आर्थिक फटका बसत आहे. या सर्वांचा विचार करून 'सिरम'ने त्यांच्या लशीचे नाव बदलावे, अशी मागणी या दाव्यात करण्यात आली आहे. ऍड. आदित्य सोनी यांच्यामार्फत "क्‍युटीस'ने ही याचिका दाखल केली आहे.

दोघांचेही अर्ज अद्याप प्रलंबित ः
"कोव्हिशिल्ड' हा ट्रेडमार्क मिळण्यासाठी "क्‍युटीस बायोटीक' आणि "सिरम' या दोनही कंपन्यांनी अर्ज केला आहे. मात्र अद्याप कोणत्याही कंपनीला हा ट्रेडमार्क देण्यात आलेला नसून त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. मात्र दरम्यानच्या काळात दोन्ही कंपन्यांनी आपली उत्पादने "कोव्हिशिल्ड' या नावाने उत्पादित करण्यास सुरवात केली आहे.

"सिरम'ने नफा आम्हाला द्यावा ः
"कोव्हिशिल्ड' या ट्रेडमार्कचा वापर करण्यास आम्ही आधी सुरवात केली आहे. तसेच त्याबाबतच अर्ज देखील आधी केला आहे. त्यामुळे "सिरम'ने "कोव्हिशिल्ड' या ट्रेडमार्कचा वापर करून लस बाजारात आणली तर त्यातून होणारा नफा "क्‍युटीस'ला द्यावा. कारण तशी तरतूद "ट्रेडमार्क ऍक्‍ट 1999' मध्ये आहे, अशी माहिती "क्‍युटीस'चे वकील सोनी यांनी दिली.

"सिरम'ला न्यायालयाची नोटीस ः
"क्‍युटीस'ने दाखल केलेल्या दाव्यानंतर न्यायालयाने "सीरम'ला नोटीस बजावली आहे. तुमच्या विरोधात दावा दाखल झाला आहे. त्यात ट्रेडमार्क वापरण्याबाबत हरकत घेण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत मनाई आदेश का देऊ नये? यावर तुमचे म्हणणे मांडा असे त्या नोटिशीत नमूद आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 जानेवारी रोजी होणार आहे.

या आहेत "क्‍युटीस'च्या मागण्या ः
- "सिरम'ने लसीचे नाव बदलावे
- "कोव्हिशिल्ड' ट्रेडमार्कचा वापर करून मिळवलेला नफा "क्‍युटीस'ला द्यावा
- "कोव्हिशिल्ड' नावाशी मिळते-जुळते नाव "सीरम'ने वापरू नये
- "सिरम'ने "कोव्हिशिल्ड' ट्रेडमार्क मिळण्याबाबत केलेला अर्ज परत घ्यावा

Web Title: The controversy over the name 'Covishield' did not end; Nanded-based company runs in Pune commercial court against Siram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.