शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
6
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
7
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
8
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
9
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
10
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
11
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
12
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
13
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
14
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
15
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
16
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
17
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
18
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
19
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
20
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

नांदेड जिल्ह्यातील घरकुलांची कामे लागणार मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:41 AM

प्रधानमंत्री आवास योजनेप्रमाणेच इतर योजनांच्या माध्यमातून घरकुलांची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर आहेत. मात्र, वाळूअभावी कामे रखडल्याची तक्रार गटविकास अधिकाऱ्यामार्फत केली जात होती. यासंबंधी बीडओंनी मागणी केल्यास घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून दिली जाणार असल्याने रखडलेल्या घरकुलांची कामे आता मार्गी लागणार आहेत.

ठळक मुद्देवाळू उपलब्ध करून देणार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : प्रधानमंत्री आवास योजनेप्रमाणेच इतर योजनांच्या माध्यमातून घरकुलांची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर आहेत. मात्र, वाळूअभावी कामे रखडल्याची तक्रार गटविकास अधिकाऱ्यामार्फत केली जात होती. यासंबंधी बीडओंनी मागणी केल्यास घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून दिली जाणार असल्याने रखडलेल्या घरकुलांची कामे आता मार्गी लागणार आहेत.ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखाली जगणाºया कुटुंबांची संख्या मोठी आहे. हजारो लोकांना पक्के घर नसल्याने ते मातीच्या घरात जीवन कंठतात. अशा नागरिकांना हक्काचा पक्का निवारा देण्यासाठी सरकारकडून प्रधानमंत्री आवास याप्रमाणे इतर योजना राबविण्यात येतात. या योजनांना प्रशासनाने मंजुरी दिली असली तरी बहुतांश कामे अर्धवट अवस्थेत आहेत. याबाबत विचारणा केल्यानंतर वाळूचे कारण पुढे केले जात असल्याने जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी निर्देश देत गटविकास अधिकाºयांनी शासकीय घरकूल योजनेसाठी वाळूची मागणी केल्यास, मागणीनुसार वाळू उपलब्ध करून देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. सद्य:स्थितीत एकट्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्धापूर तालुक्यात ९३, भोकर- ८४०, बिलोली १९१७, देगलूर - ११०३, धर्माबाद - ३७१, हदगाव - २८५, हिमायतनगर - ४१५, कंधार - १३०६, किनवट - ११३१, लोहा - ७६३, माहूर - ४७२, मुदखेड - ३८६, मुखेड - २४८६, नायगाव - १७७९, नांदेड - १९० तर उमरी तालुक्यात ३८० घरकुलांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. म्हणजेच जिल्ह्यात एकट्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गतची १३ हजार ९१७ कामे अर्धवट आहेत. जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता ही कामे पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे.---लाभार्थ्यांचाही पुढाकार आवश्यकनांदेड जिल्ह्यासाठी २०१६-१७ या वर्षामध्ये ११ हजार ५०७ घरकुलांचे उद्दिष्ट होते. तर २०१७-१८ या वर्षात ६ हजार ४२५ आणि चालू आर्थिक वर्षात २ हजार १३० असे तीन वर्षांत २० हजार ६२ घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी केवळ ६ हजार १४५ घरे पूर्ण झाली आहेत. शासनाने लाभार्थ्यांना पहिली आणि दुसरी उचल देवू केली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनीही आता घरबांधणीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.---उद्दिष्टानुसार जिल्ह्यातील घरकुलांची कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे़ मात्र घरकुलाच्या रखडलेल्या कामाबाबत विचारणा केल्यानंतर वाळूअभावी कामे थांबल्याचे सांगितले जाते़ त्यामुळेच घरकुल योजनेसाठी मागणीनुसार वाळू उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़- अरुण डोंगरे, जिल्हाधिकारी

टॅग्स :NandedनांदेडHomeघरNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडsandवाळू