शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

नांदेड-लातूरला थेट रेल्वेमार्गाने जोडा, निम्मा खर्च राज्य शासन उचलेल : अशोक चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 19:33 IST

Ashok Chavhan on Nanded - Latur Railway : या दोन्ही शहरांना सरळ रेषेत जोडणारा रेल्वे मार्ग टाकल्यास त्याचे अंतर साधारणतः १०० किलोमीटर असेल.

नायगाव(नांदेड) : मराठवाड्यातील ( Marathawada ) प्रमुख शहरे नांदेडलातूरलारेल्वे मार्गाने थेट जोडण्याची (Connect Nanded-Latur directly by rail ) मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavhan ) यांनी केली आहे. तसेच यासाठी राज्य शासन निम्मा खर्च उचलण्यास तयार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. ते नायगाव येथे नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते.  

या नवीन व रेल्वे मार्गाची आवश्यकता विषद करताना मंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, लातूर-नांदेड मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात दळणवळण आहे. रस्ते मार्गाने हे अंतर सुमारे १४४ किलोमीटर आहे. तर  पूर्णा, परभणी, परळी, लातूर रोड मार्गे रेल्वे मार्गाने हे अंतर २१२ किलोमीटर आहे. या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना हा प्रवास पूर्ण करण्यासाठी साधारणतः सहा तासांचा कालावधी लागतो. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वे वाहतूक स्वस्त व वेगवान असल्याने नांदेड व लातूर दरम्यान नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प मंजूर करण्याची गरज आहे. या दोन्ही शहरांना सरळ रेषेत जोडणारा रेल्वे मार्ग टाकल्यास त्याचे अंतर साधारणतः १०० किलोमीटर असेल. त्यामुळे ताशी किमान १०० किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे जेमतेम सव्वा तासांत नांदेडहून लातूरला पोहचू शकेल. या रेल्वे मार्गामुळे नांदेड ते पुण्यामधील रेल्वे अंतर देखील कमी होऊन प्रवाशांचा तसेच मालवाहतुकीचा वेळ आणि पैसा वाचू शकेल, असेही चव्हाण म्हणाले. 

'नांदेड-लातूर' रेल्वेचा निम्मा खर्च राज्यशासन करेल केंद्र सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिल्यास ५० टक्के खर्च उचलण्याची राज्य शासनाची तयारी असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. या रेल्वे मार्गामुळे नांदेड, लातूर तसेच परभणी जिल्ह्यातील अर्थकारणाला अधिक गती मिळणार असल्याने या प्रकल्पासाठी सर्व राजकीय पक्षांनी, केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयाने काम केले पाहिजे, असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.

टॅग्स :laturलातूरNandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणrailwayरेल्वे