शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये ७३ जागा टिकविण्याचे काँग्रेसपुढे आव्हान; अशोकराव चव्हाण कितपत कमळ फुलवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:08 IST

मनपा निवडणूक : अशोकराव चव्हाण यांच्या पक्षांतरानंतर पहिल्यांदाच होणार निवडणूक

- श्रीनिवास भोसलेनांदेड : मनपा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. तापलेल्या राजकीय वातावरणात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांच्या पक्षांतरानंतर पहिल्यांदाच ही मनपा निवडणूक होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने २०१७ मध्ये मिळविलेल्या ७३ जागा टिकविण्याचे आव्हान विद्यमान काँग्रेस नेतृत्वासह खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांच्यापुढे आहे. त्याचबरोबर भाजपमध्ये गेलेले अशोकराव चव्हाण नांदेडमध्ये कमळ कितपत फुलवू शकतात, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. त्यावेळी अशोकराव चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यावेळी ८१ पैकी तब्बल ७३ जागांवर काँग्रेसचा झेंडा फडकला होता. भाजपला ६, शिवसेनेला १ आणि एका अपक्ष उमेदवाराला यश मिळाले होते. स्वतंत्र लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी आदी पक्षांना खातेही उघडता आले नव्हते. दरम्यान, २०२२ मध्ये मनपाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने प्रशासकराज लागू झाले. त्यानंतर आता सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सध्याच्या रणधुमाळीत अनेक पक्ष स्वतंत्र लढण्याची भाषा करत असले, तरी राज्य पातळीवरील निर्णयांवर अंतिम समीकरणे अवलंबून असणार आहेत.

राष्ट्रवादीसमोर ‘भोपळा फोडण्याचे’ आव्हानराष्ट्रवादी काँग्रेस आता दोन गटांत विभागली गेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीसमोर मनपा निवडणुकीत भोपळा फोडण्याचे आव्हान आहे. सध्या अशोकराव चव्हाण भाजपमध्ये असून, राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्याकडे महापालिका निवडणुकीची प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे. दोन्ही खासदारांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून जोरदार तयारी सुरू असून, कोणत्याही परिस्थितीत नांदेड मनपावर भाजपचा झेंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे. भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही स्वतंत्र लढण्याची तयारी चालविली आहे. महापालिका क्षेत्रात येणाऱ्या नांदेड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मनपावर भगवा फडकविण्यासाठी आमदार बालाजीराव कल्याणकर आणि आमदार आनंद बोंढारकर यांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्यापुढे मनपात राष्ट्रवादीच्या ‘घड्याळा’ची टिकटिक पुन्हा सुरू करण्याचे आव्हान असणार आहे.

वंचितची भूमिका ठरणार निर्णायकमहापालिका क्षेत्रात दलित व मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि मनसे यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. काँग्रेसकडून स्वतंत्र लढण्याची भूमिका मांडली जात असताना, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) कोणती भूमिका घेतात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded Municipal Elections: Congress faces challenge, Chavan's BJP impact?

Web Summary : Nanded Municipal Corporation elections heat up after Ashok Chavan's defection. Congress defends 73 seats against BJP. NCP faces internal challenges. Dalit and Muslim votes crucial. All eyes on political alliances.
टॅग्स :Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण