शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

काँग्रेसकडून अद्याप प्रस्तावच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:47 AM

वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचा कोणताही प्रस्ताव आतापर्यंत आला नाही़ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याशी चर्चा झाली असली तरीही अधिकृत प्रस्ताव अद्याप आला नाही़ त्याचवेळी अजूनही चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले़

ठळक मुद्देसत्ता संपादन महासभाप्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन

नांदेड : वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचा कोणताही प्रस्ताव आतापर्यंत आला नाही़ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याशी चर्चा झाली असली तरीही अधिकृत प्रस्ताव अद्याप आला नाही़ त्याचवेळी अजूनही चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले़नांदेडमध्ये गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन महासभेसाठी अ‍ॅड़आंबेडकर हे नांदेडमध्ये आले होते़ त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसकडून आघाडीबाबत अद्याप अधिकृत प्रस्ताव आला नसल्याने वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवण्याच्या तयारीत आहे़ यामध्ये एमआयएमही सोबत असल्याचे ते म्हणाले़ काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी एमआयएमला बाजूला करण्याची अट घातली जात असल्याबाबत विचारले असता काँग्रेस अनेक ठिकाणी भाजपासोबत सत्तेत विराजमान असल्याचे सांगितले़याबाबत त्यांनी उदगीर नगरपालिकेचे उदाहरण दिले़ काँग्रेसने भाजपाला सर्वप्रथम सोडावे, नंतर आमच्यावर टीका करावी, असे ते म्हणाले़ बहुजन वंचित आघाडीचा आरएसएसला असलेला हा विरोध सैद्धांतिक असल्याचे ते म्हणाले़ आरएसएस व्यक्तिगत, धर्मस्वातंत्र, लोकशाहीला नकार देते तर मनुवादी व्यवस्थेचा पुरस्कार करते़ यामुळे आमचा त्यांच्या विचाराशी लढा आहे़प्रकाश आंबेडकर लोकसभेवर गेले पाहिजे अशी काँग्रेसची इच्छा असल्याच्या वक्तव्याबाबत विचारले असता काँग्रेसने २००४ पासून सातत्याने आपल्या विरोधात उमेदवार दिले असल्याचे त्यांनी सांगितले़ त्यामुळे काँग्रेसचे हे प्रेम दुटप्पी आहे़ असाच दुटप्पीपणा आ़ जोगेंद्र कवाडे हेही दाखवित असल्याचे ते म्हणाले़ एमआयएमचे आ़इम्तियाज जलील यांनीही यासंदर्भात मराठा आरक्षण विरोधात याचिका दाखल केल्यासंदर्भात माहिती देताना मराठ्यांना विविध समित्यांच्या शिफारशीवरील आरक्षण दिले गेले़ पण मुस्लिमांच्या आरक्षणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या अनेक समित्यांचे अहवाल सरकारने स्वीकारलेच नाहीत़ काँग्रेस आघाडीच्या काळातही मुस्लिम आरक्षण संदर्भात अनेक समित्यांचे अहवाल प्राप्त झाले होते़ मात्र ते बाजूला टाकण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले़यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फेरोज लाला, प्रा़यशपाल भिंगे, श्याम कांबळे, प्रशांत इंगोले आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :NandedनांदेडPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेस