शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

दिलासादायक ! नांदेडचा कोरोना मृत्युदर ७.२ टक्क्यांवरून आला ३.५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 1:22 PM

जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दररोज शतकपारच आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या ३ हजारापेक्षा अधिक आतापर्यंत १ हजार ६३२ रुग्ण कोरोनामुक्ततर आतापर्यंत एकूण १२० मृत्यू झाले आहेत

नांदेड : नांदेडचा कोरोना मृत्युदर मे महिन्यात  ७.२ टक्क्यांवर पोहोचला होता. तो ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात घसरून ३.५ टक्क्यांवर पोहचला असल्याने दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यात सर्वात कमी मृत्युदर जूनमध्ये ३.४ टक्के इतका होता. कोरोना रुग्णांची संख्या जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली होती.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दररोज शतकपारच आहे. ३ ऑगस्टला हा आकडा २०३ वरही पोहचला होता. जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता ३ हजारापेक्षा अधिक झाली आहे. त्याचवेळी मध्यंतरी वाढलेला मृत्युदर ही चिंतेची बाब होती. एकाच दिवशी ११ बळीही नांदेडमध्ये गेले होते. त्यानंतर हा मृत्युदर कमी करण्यासाठी विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात विविध उपाययोजना करण्यात आल्या. या उपाययोजनांना काहीअंशी यशही आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ देशमुख यांच्या प्रयत्नातून हा मृत्युदर कमी करण्यात यश येत आहे.  मे महिन्यामध्ये तर नांदेड जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर हा ७.२ टक्के इतका होता. जूनमध्ये तो ३.४ टक्क्यांवर आला. जुलैमध्ये या मृत्युदरात वाढ होऊन ४.४ टक्क्यांवर मृत्युदर पोहचला होता. ऑगस्टमध्ये आता तो घसरून ३.५ टक्के इतका झाला आहे.

जिल्ह्यातील १ हजार ६३२ रुग्ण कोरोनामुक्तजिल्ह्यात एकूण ३ हजार २९७ रुग्णसंख्या जिल्ह्यात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आतपर्यंत १ हजार ६३२ रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी दिली आहे. तर आतापर्यंत एकूण १२० मृत्यू झाले आहेत. ९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक २१७ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. यात सर्वाधिक रुग्ण हे नांदेडमधील पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील होते. त्यापाठोपाठ मुखेडमध्ये २८, हदगाव-२७, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १९, किनवट- १०, उमरी-१४, मुदखेड कोविड केअर सेंटरमधून १० रुग्णांना सुट्टी देण्यात आली होती.

मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर भरजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात शंभराहून अधिक येत आहे. ही रुग्णसंख्या वाढण्याचे कारण म्हणजे जिल्ह्यात कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत. अ‍ॅन्टीजन तपासण्यासह आरटीपीसीआर चाचण्याही केल्या जात आहेत. जिल्ह्यात आजघडीला प्रतिदिन ३ हजार चाचण्या होत आहेत. या चाचण्यातून १०० ते १५० रुग्ण सापडत आहेत. रुग्णसंख्या वाढती असली तरीही त्यांना शोधून योग्य उपचार दिले जात आहेत. मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड