CAA : नांदेडमध्ये सर्व पक्षीय धरणे आंदोलनातून नागरिकत्व कायद्याला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 18:10 IST2019-12-20T18:06:37+5:302019-12-20T18:10:36+5:30
या आंदोलनात भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांचे नेते,कार्यकर्ते सहभागी झाले.

CAA : नांदेडमध्ये सर्व पक्षीय धरणे आंदोलनातून नागरिकत्व कायद्याला विरोध
नांदेड: नागरिकत्व कायद्याच्या दुरुस्तीला विरोधात आयोजित धरणे आंदोलनालानांदेडमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रचंड संख्येने जमलेल्या आंदोलनकर्त्यांच्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.
केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला देशभर प्रचंड असंतोष उफाळून येत आहे. हा कायदा अन्यायकारक असल्याचा आरोप करत नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते सहभागी झाले. धरणे आंदोलनात प्रचंड संख्येने लोक सहभागी झाले होते. हमे चाहीये आझादी, यह देश हमारा है अशा घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमून गेला होता. आंदोलनात प्रचंड संख्येने जमाव जमला होता, मात्र सर्व आंदोलन हे शांततेत पार पडले.