भाजपकडून अनेक जणांवर सुडाच्या राजकारणाचा प्रयोग - जितेंद्र आव्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 13:15 IST2021-01-02T13:13:38+5:302021-01-02T13:15:40+5:30
Jitendra Awhad : सरकार कधी पडते, याचीच वाट भाजपवाले पाहत बसले आहेत

भाजपकडून अनेक जणांवर सुडाच्या राजकारणाचा प्रयोग - जितेंद्र आव्हाड
नांदेड : भाजपकडून सूड आणि द्वेषाचे राजकारण केले जात आहे. हे सरकार कधी पडते, याचीच वाट भाजपवाले पाहत बसले आहेत; परंतु त्यांचा हा उद्देश कधीही सफल होणार नाही,अशी टीका राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.
मंत्री जितेंद्र आव्हाड हे शुक्रवारी माहूर येथील श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी आले होते. आव्हाड यांनी श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर दत्तशिखरावर दत्तप्रभूंचे दर्शन घेतले. ते पहिल्यांदाच माहूर गडावर आले होते. यावेळी आव्हाड म्हणाले, भाजप हे सुडाचे राजकारण करीत आहे. आजपर्यंत भाजपकडून अनेक जणांवर तसा प्रयोग करण्यात आला आहे. राज्य सरकार कधी पडते आणि आम्ही कधी सत्तेवर येऊ, हाच एकमेव विचार त्यांच्या डोक्यात घोळत असतो; परंतु महाआघाडी मजबूत असून भाजपचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत, असेही ते म्हणाले.