भाजपा कार्यकर्त्यांची शेतकऱ्यास धक्काबुकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:42 IST2019-07-12T00:41:50+5:302019-07-12T00:42:22+5:30
तालुक्यातील बन्नाळी येथील शेतकरी तथा शिवा संघटनेचे कार्यकर्ते दिगंबर शंकरराव खपाटे यांना भाजपाचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य राजेश पवार यांच्या सुरक्षा रक्षकाकडून व कार्यकर्त्यांकडून सोमवारी धक्काबुकी करण्यात आली़ दरम्यान, या प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

भाजपा कार्यकर्त्यांची शेतकऱ्यास धक्काबुकी
धर्माबाद : तालुक्यातील बन्नाळी येथील शेतकरी तथा शिवा संघटनेचे कार्यकर्ते दिगंबर शंकरराव खपाटे यांना भाजपाचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य राजेश पवार यांच्या सुरक्षा रक्षकाकडून व कार्यकर्त्यांकडून सोमवारी धक्काबुकी करण्यात आली़ दरम्यान, या प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकेत अधिकारी व कर्मचाºयांकडून कामात अडवणूक होत असल्याच्या तक्रारी तसेच शासनाने केलेल्या कर्ज माफी व पीककर्जाची माहीती घेण्यासाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य राजेश पवार यांनी सोमवारी येथील विविध बँकेत जाऊन मॅनेजर यांची भेट घेतली़ यावेळी महाराष्ट्र बँकेत बन्नाळी येथील शेतकरी दिगंबर खपाटे यांनी राजेश पवार यांना आतापर्यत किती शेतकºयांना कर्जमाफी मिळाली असल्याचे विचारले़ तेव्हा पवार यांनी मला माहिती विचारू नकोस नरेंद्र मोदी यांना विचार असे सांगितले़ मात्र हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नसल्याचे खपाटे यांनी सांगताच पवार यांच्या सुरक्षा रक्षक व एका भाजपा कार्यकर्त्याने त्यांना धक्काबुकी करून बँकेच्या बाहेर काढले़ या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी काही शेतकºयांनी राजेश पवार यांची गाडी अडवली़ परंतु पवार गाडीत बसून शेतकºयांना बोलत असताना पुन्हा खपाटे यांना कार्यकर्त्यांकडून धक्काबुकी करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे़ या घटनेची माहिती शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांना कळाल्यानंतर त्यांनी या घटनेचा निषेध केला़ सदरील आरोपीवर कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला़ पोलिसांनी घटनेची दखल घेवून येथील बाजार समितीचे तज्ज्ञ संचालक अशोक वडजे, नागेश कहाळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष बाजार समितीचे संचालक अशोक वडजे यांनी दिगंबर खपाटे व ललेश संगावार यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसात दिली आहे़