बिलोली विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण : आरोपींच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षक कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 04:15 PM2020-01-22T16:15:12+5:302020-01-22T16:17:18+5:30

या प्रकरणातील सर्व आरोपी अद्यापही फरार आहेत

Biloli student rape case: agitation against police superintendent's office for arrest of accused | बिलोली विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण : आरोपींच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षक कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन 

बिलोली विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण : आरोपींच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षक कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन 

Next

नांदेड : जिल्ह्यातील शंकर नगर येथे अल्पवयीन विद्यार्थीनिवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकांना अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर युवा पँथर संघटनेने ठिय्या आंदोलन केले.

बिलोली तालुक्यातील शंकर नगर येथील साईबाबा माध्यमिक महाविद्यालयात शिकणाऱ्या एका 14 वर्षीय मुलींवर शाळेतील दोन शिक्षकानी अत्याचार  केले. या प्रकरणी एकूण पाच जणांविरोधात रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पण सगळे आरोपी अजून फरार आहेत. या आरोपीना तत्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी युवा पँथर संघटनेने पोलीस अधिक्षक कार्यालया समोर निदर्शने केली. यावेळी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा संस्था चालक भास्करराव पाटील खतगावकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, रामतीर्थ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे, प्रकरणाचा तपास महिला अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात यावा अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. 

Web Title: Biloli student rape case: agitation against police superintendent's office for arrest of accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.