शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये भोंदूबाबाचा शिष्येवर अत्याचार; नामांकित मठातील गुरूनेच लग्नाचे आमिष दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 05:59 IST

आयुष्याच्या उतारवयात अध्यात्माकडे त्या वळल्या होत्या. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी भोंदूबाबाच्या विरोधात गुन्हा नोंद केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नांदेड : शहरातील एका नामांकित मठातील भोंदूबाबाने आपली शिष्य असलेल्या विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार जुलै २०२५ पासून सुरू होता. नंतर मात्र संन्यासी असल्याचे सांगून लग्नाला नकार देत पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाकण्याची धमकीही दिली. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी भोंदूबाबाच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून, त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पीडित महिलेचे (वय ४७) बारावीपर्यंत शिक्षण झाले असून, पतीचे निधन झाल्याने त्या एकट्याच राहतात. 

आयुष्याच्या उतारवयात अध्यात्माकडे त्या वळल्या होत्या. परिसरातील इतर महिलांसोबत त्या १२ मे २०२५ रोजी पौर्णिमेनिमित्त गाडीपुरा येथील प्रसिद्ध मठात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी पीडित महिलेची आरोपी संत हरिगीर दत्तगीर गिरी महाराज (वय ३८) यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर पीडित महिलेने जून महिन्यात संत हरिगीर दत्तगीर महाराज यांना गुरू केले. दर गुरुवारी त्या मठामध्ये गुरूच्या दर्शनासाठी जात होत्या. एके दिवशी महाराजांनी पीडितेचा मोबाइल नंबर घेऊन आपलाही नंबर दिला. त्यावरून रात्री उशिरापर्यंत हरिगीर महाराज हे पीडितेशी बोलत होते.

१६ जुलै रोजी ते पीडितेच्या घरी आले. पीडितेने हरिगीर याची पाद्यपूजा करीत आशीर्वादही घेतले. त्यावेळी पीडितेने विरोध केला असताना महाराजाने जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतरही दोन वेळेस या भोंदूबाबाने पीडितेवर अत्याचार केला. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, आरोपी भाेंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत.

पीडिता विधवा असल्याने घेतला गैरफायदा

हरिगीर महाराज याने पीडिता ही विधवा असल्याची संधी साधून अत्याचार केल्यानंतर लग्नाचे आमिष दाखविले होते. परंतु, नंतर मात्र संन्यासी असल्याने लग्न करता येत नाही असे म्हणत नकार दिला. तसेच वेळोवेळी पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाक, अशी धमकीही हरिगीर याच्याकडून देण्यात येत होती.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Guru in Nanded Abused Disciple, Promised Marriage Deceitfully

Web Summary : In Nanded, a fake guru from a renowned monastery sexually abused a widowed disciple after promising marriage. He later refused and threatened her. Police arrested the accused.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस