शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिया सुळेंची छोटी कृती, मोठा संदेश; यात्रा मार्गातील कचरा उचलत जागरूकतेची झलक

By सुमेध उघडे | Updated: November 10, 2022 18:51 IST

राहुल गांधींच्या साथीला राष्ट्रवादी; खा. सुप्रिया सुळे, आ. जयंत पाटील यात्रेत सहभागी

नांदेड : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा आज नांदेड शहरात दाखल झाली. यावेळी त्यांच्या साथीला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिसून येत आहेत. राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहभागाने यात्रेत उत्साह संचारला होता. दरम्यान, खा. सुळे यांच्या एका छोट्या कृतीने पदयात्रेत मोठा संदेश गेला आहे. यात्रेच्या मार्गात प्लास्टिक बॅगचा कचरा दिसताच नकळत खा. सुळे यांनी उचलून घेतला. 

महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा राहुल गांधी नांदेडात घेणार असून, त्यांच्या सभेची उत्सुकता ताणली गेली आहे. आज दुपारी पदयात्रा नांदेड शहरात दाखल झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसचे नेते खा. सुप्रिया सुळे, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी यात्रेत सहभाग घेतला. त्यांच्या सहभागाने यात्रेस आणखी बळ मिळाल्याचे चित्र होते. खा. सुळे आणि जयंत पाटील यांनी यात्रेकरुंसोबत संवाद साधला. खा. सुळे मनमोकळ्या संवादासाठी प्रसिद्ध आहेत. यामुळे त्यांच्या आजूबाजूला कार्यकर्त्यांची गर्दी होती. यात्रा शिवाजी नगर येथे आली असता खा. सुळे यांना समोरील मार्गात प्लास्टिकचा बॅगचा कचरा दिसला. सर्वजण त्यावरून जात असताना खा. सुळे यांनी ती बॅग खाली वाकून उचलली. खूप गर्दी असतानाही रस्त्यात पडलेला कचरा दिसताच एक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडत त्यांनी सहज प्लास्टिक बॅग उचलली. त्यांच्या या छोट्या कृतीने सहभागी सर्वांना मोठा संदेश दिला आहे. साधेपणासोबत खा. सुळे यांच्या जागरूकतेची चर्चा यानिमित्ताने यात्रेकरूंमध्ये सुरु होती. 

राहुल गांधी काय बोलणार ?

कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेला प्रारंभ झाला. ६० दिवसांचा प्रवास करून या यात्रेने ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातून महाराष्ट्रात प्रवेश केला. दोन दिवसांपासून ही यात्रा जिल्ह्यात आहे. देगलूर या तालुक्यातील वेन्नाळी, आटकळी, बिलोली तालुक्यांतील खतगाव फाटा, भोपाळामार्गे ही यात्रा ९ नोव्हेंबर रोजी नायगाव तालुक्यातील शंकरनगर येथे पोहोचली आहे. आज शंकरनगर, नायगाव आणि कृष्णूरपर्यंतचा प्रवास करून ही यात्रा दुपारी नांदेड शहरातील देगलूर नाका येथे पोहोचली. संध्याकाळी शहरातील नवा मोंढा येथे राहुल गांधी राज्यातील पहिल्या जाहीर सभेस संबोधित करणार आहेत. 

राज्याच्या राजकारणावर काय बोलणार?
महाराष्ट्रात शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते. शिवसेनेतील बंडाळीनंतर हे सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे गट- भाजपचे सरकार स्थापन झाले. यावर राहुल गांधी काय बोलतात? देशातील महागाई, बेरोजगारी, शिक्षणाच्या प्रश्नावरही त्यांची भूमिका गुरुवारी जाहीर सभेतून पुढे येणार आहे. त्यामुळे या जाहीर सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राNandedनांदेडSupriya Suleसुप्रिया सुळेRahul Gandhiराहुल गांधी