नांदेड येथे कोरोनाने सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 19:52 IST2021-05-11T19:52:09+5:302021-05-11T19:52:42+5:30
कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास १७०० जणांचा मृत्यू झाला आहे.

नांदेड येथे कोरोनाने सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
नांदेड : जिल्ह्यातील मांडवी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय मारोती कोळी (५२) यांचा मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत कोरोनाने पोलीस दलाला आठ हादरे दिले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास १७०० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मांडवी येथे कार्यरत सपोउपनि विजय कोळी हे ९ मे रोजी बाधित आढळले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. यापूर्वी पोलीस अंमलदार बालाजी ढगे, संतोष मठपती, रामलू आलुरे, किरण तेलंगे, भाऊराव राऊत, मीरा आरुटले, भगवान वाघमारे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.