शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अशोकराव चव्हाणांची साथ भोवली; अर्धापूर नगराध्यक्षासह ८ नगरसेवकांची कॉँग्रेसमधून हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 14:20 IST

नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह ८ नगरसेवकांवर शिस्तभंगाची कार्यवाही करत काँग्रेस पक्षातून हकालपट्टी..!!!

- गोविंद टेकाळे अर्धापूर ( नांदेड) : काँग्रेसमधून निवडून येऊनही लोकसभा निवडणुकीत भाजपासाठी काम करणाऱ्या त्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह ८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम यांनी पत्रकार परिषदेतून दिली. या कारवाईने हकालपट्टी झालेल्या सर्वांना माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते अशोक चव्हाण यांची साथ भोवल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे.

अर्धापूर नगरपंचायत निवडणूक माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडल्या. अडीच वर्षाचा कालावधी लोटला असून गत काही महिन्यापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजप प्रवेश केला. काँग्रेस पक्षातून निवडून आलेले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांनी काँग्रेसमधून निवडून आले असतांनाही भाजपात प्रवेश केलेल्या अशोकराव चव्हाण यांच्यासोबत राहून लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केले. तसेच पक्षाच्या विविध बैठकांना अनुपस्थित राहणे, पक्ष विरोधी भूमिका घेतल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांनी याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार केली. यानंतर पटोले यांनी जिल्हाध्यक्ष कदम यांना सदर नगराध्यक्ष, नगरसेवकांवर योग्य ती कारवाई करण्याबाबतचे अधिकार दिले. 

दरम्यान, सदर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांची पक्षशिस्तीचा भंग केल्याबाबत काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कदम यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली. यावेळी तालुका प्रभारी डॉ.उत्तमराव इंगळे,सचिव पंडितराव शेटे, तालुकाध्यक्ष सुनील वानखेडे, प्रवक्ते सुभाष लोणे, रविंद्र डाढाळे, तालुका सचिव शेख.मकसूद आदींची उपस्थिती होती.

नगराध्यक्षांसह ८ नगरसेवकांची हकालपट्टीनगराध्यक्ष छत्रपती कानोडे, उपनगराध्यक्षा यास्मिन सुलताना मुस्वीर खतीब यांच्यासह आठ नगरसेवक १) शालीनी व्यंकटेश शेटे, २) मिनाक्षी व्यंकटी राऊत ३) वैशाली प्रविण देशमुख, ४) डॉ. पल्लवी विशाल लंगडे, ५) सोनाजी विठ्ठल सरोदे, ६) काजी सायरा बेगम काजी सल्लावोद्दीन, ७) म. सलीम कुरेशी, ८) नामदेव सरोदे

टॅग्स :Nandedनांदेडcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण