बारवात उडी घेऊन वृद्ध शेत मजूर महिलेने संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 12:08 IST2023-09-19T12:04:57+5:302023-09-19T12:08:17+5:30

घटनेची माहिती समजल्यानंतर बारव परिसरामध्ये बघ्यांची गर्दी जमा झाली होती.

An old farm laborer woman ended her life by jumping in well | बारवात उडी घेऊन वृद्ध शेत मजूर महिलेने संपविले जीवन

बारवात उडी घेऊन वृद्ध शेत मजूर महिलेने संपविले जीवन

- शेखर पाटील 
मुखेड :
गावातीलच बारवात उडी घेऊन एका महिलेने आपले जीवन संपविल्याची घटना गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी उघडकीस आली आहे.

पार्वतीबाई शंकरराव कोत्तापल्ले (५५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. शहरातील बारवगल्ली भागात पुरातन बारव आहे. याच भागामध्ये पार्वतीबाई कोत्तापल्ले यांचे निवासस्थान आहे. १९ सप्टेंबर रोजी सकाळी साधारणता साडेआठ वाजण्याच्या सुमारास या बारवात उडी घेऊन पार्वतीबाई  कोत्तापल्ले यांनी आत्महत्या केली. घटनेची माहिती समजल्यानंतर बारव परिसरामध्ये बघ्यांची गर्दी जमा झाली होती.

पार्वतीबाई कोतपल्ली या शेतमजूर होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. पार्वतीबाई यांनी आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मुखेड पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद घेण्याचे काम सुरू आहे.

Web Title: An old farm laborer woman ended her life by jumping in well