अमित शाह नांदेडात दाखल; राज्यातील महाजनसंपर्क अभियानाचा करणार शुभारंभ
By श्रीनिवास भोसले | Updated: June 10, 2023 18:19 IST2023-06-10T18:18:40+5:302023-06-10T18:19:11+5:30
देशातील मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यामुळे भाजपच्यावतीने महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे.

अमित शाह नांदेडात दाखल; राज्यातील महाजनसंपर्क अभियानाचा करणार शुभारंभ
नांदेड : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह शनिवारी दुपारी नांदेड येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनीही त्यांचे स्वागत केले.
यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार प्रतापराव चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार राम रातोळीकर, आमदार प्रविण दरेकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार भिमराव केराम, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार श्यामसुंदर शिंदे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. एस. एम. महावरकर, प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले, मनपा आयुक्त महेश डोईफोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
देशातील मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यामुळे भाजपच्यावतीने महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील महाजनसंपर्क अभियानाचा शुभारंभ अमित शाह यांच्या जाहीर सभेने थोड्याच वेळात होणार आहे.