शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

समाजातील सर्व घटक भाजपाच्या काळात त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:32 AM

नोटाबंदी, जीएसटी, महागाई, स्त्रीयांवरील वाढते अत्याचार या सर्वांमुळे समाजातील सर्व घटक त्रस्त असून देशात वैचारिक विष पेरण्याचे काम भाजप करीत आहे़ त्यामुळे ‘अच्छे दिन’चे स्वप्न पाहणाऱ्या जनतेला भाजपवालोंसे देश अन् बेटी बचाओं, असे म्हणण्याची वेळ आली, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़

ठळक मुद्देकाँग्रेसच्या जाहीर सभेत अशोकराव चव्हाण यांची जबर टिका

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नोटाबंदी, जीएसटी, महागाई, स्त्रीयांवरील वाढते अत्याचार या सर्वांमुळे समाजातील सर्व घटक त्रस्त असून देशात वैचारिक विष पेरण्याचे काम भाजप करीत आहे़ त्यामुळे ‘अच्छे दिन’चे स्वप्न पाहणाऱ्या जनतेला भाजपवालोंसे देश अन् बेटी बचाओं, असे म्हणण्याची वेळ आली, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जुना मोंढा येथे आयोजित जाहीर सभेत खा. चव्हाण बोलत होते. खा. चव्हाण पुढे म्हणाले की, उत्तरप्रदेशातील मेरठ व जम्मू-कश्मीरमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना निषेधार्ह आहे. भाजपच्या काळात मुली व महिला असुरक्षीत असून अत्याचाराच्या घटना ३८ टक्क्यांनी वाढल्या. यावर शासनाचे नियंत्रण नाही. उलट यात भाजप आमदार, पदाधिकारी आरोपी असून त्यांना अटक करण्यास १० ते १५ दिवसांचा वेळ लागतो. एकप्रकारे बलात्काºयांना पाठीशी घालण्याचे काम सरकार करीत असल्याची टिका खा़चव्हाण यांनी केली़ आरएसएसच्या मनावर चालणारे सरकार असून त्यांच्या हालचाली संशयास्पद दिसत आहे़ संविधान बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ परंतु, काँग्रेस ते कधीही होवू देणार नाही़ सध्या अनेक राज्यातील एटीएममध्ये ठणठणाट असून सर्व नोटा कर्नाटकातील निवडणुकीसाठी भाजपने नेल्याचा आरोप केला़ तसेच नोटा नेल्या नसतील तर त्या कुठे गेल्या याचे उत्तर सरकारने द्यावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़सभेत बोलताना राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट म्हणाले की, देशात ३० वर्षांनंतर संपूर्ण बहुमत भाजपाला मिळाले. मात्र सरकारने जनतेचा भ्रमनिराश केला. नोटबंदी, जीएसटी आदी निर्णयामुळे सामान्य जनता कोंडीत सापडली. आता निवडणुकीच्या तोंडावर जातीय तेढ निर्माण करण्याचे काम सरकार करीत आहे. यावेळी कॉग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी त्यांच्या काळात बँकाचे मजबुतीकरण केले. त्यानंतर मनमोहनसिंघ यांनी जगातील बँका दिवाळखोरीत निघाल्या असताना भारतीय अर्थव्यवस्था सक्षम ठेवली, आता मात्र बँकांचा आर्थिक कणा मोडला आहे. आमचाच पैसा आम्हाला मिळत नाही, ज्यांना चौकीदार बनवले तेच आता सोनेवाले सोते रहो, चोरी करनेवाले भागते रहो, असे म्हणत आहेत, असे मोहनप्रकाश म्हणाले. यावेळी माणिकराव ठाकरे, नसीमखान यांचीही भाषणे झाली.

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणMohan Prakashमोहन प्रकाश