शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

आरटीई प्रवेशासाठी प्रशासनाची दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:46 AM

आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव कोट्यातून दुसऱ्या फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २७ जून ही अंतिम मुदत आहे़ मात्र मागील चार दिवसांपासून नांदेडचे गटशिक्षणाधिकारी गैरहजर असल्याने ही प्रवेशप्रक्रिया खोळंबली आहे़

ठळक मुद्देआज शेवटचा दिवस दुसरी फेरी, गटशिक्षणाधिकारी रजेवर गेल्याने तीन दिवस प्रक्रिया खोळंबली

नांदेड : आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव कोट्यातून दुसऱ्या फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २७ जून ही अंतिम मुदत आहे़ मात्र मागील चार दिवसांपासून नांदेडचे गटशिक्षणाधिकारी गैरहजर असल्याने ही प्रवेशप्रक्रिया खोळंबली आहे़ त्यांच्या गैरहजेरीत संबंधित अधिकाऱ्यांनीही प्रवेश प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले़ त्यामुळे शेवटच्या दिवशी पालकांची प्रमाणपत्र पडताळणीसाठी धावपळ उडणार आहे़ प्रशासनाच्या या हलगर्जीपणाबद्दल पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला़बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यातंर्गत विनाअनुदानित शाळा, कायम विनाअनुदानित शाळा व स्वयंअर्थ सहायित शाळेत २५ टक्के आरटीई राखीव कोट्यातून दुसºया फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची मुदत गुरूवारी संपत आहे़ ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे़ अशा विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात केली जात आहे़ मात्र, गेल्या चार दिवसांपासून गटशिक्षणाधिकारी रूस्तुम आडे हे रजेवर आहेत़ या दरम्यान अनेक पालक आपल्या पाल्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात चकरा मारत होते़ मात्र त्यांच्या गैरहजेरीत कोणताही अधिकारी ही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी पुढे येत नव्हता़ त्यामुळे पालकांना परत जावे लागत होते़ बुधवारी काही संतप्त पालकांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात जाऊन आमच्या मुलांचे प्रवेश न झाल्यास कोण जिम्मेदार राहणार, शेवटच्या दिवशी प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणे शक्य आहे का, असे प्रश्न विचारून संबंधितांना धारेवर धरले़मागील चार दिवसांपासून आम्ही पंचायत समितीला चकरा मारत आहोत. मात्र या ठिकाणी गटशिक्षणाधिकारी नसल्याने आमचे काम झाले नाही़ सध्या पेरणीचे दिवस असून शेतातील कामे सोडून आम्ही या कामासाठी दिवसभर या कार्यालयात थांबत आहोत़ रजेच्या काळात एखादा अधिकारी या कामासाठी नियुक्त करणे गरजेचे असल्याचे पालकांनी सांगितले़ दरम्यान, पंचायत समिती सभापती सुखदेव जाधव यांनी गुरूवारी शेवटच्या दिवशी प्रवेशप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या़पहिल्या फेरीत २३२५ विद्यार्थी निवडलेआरटीईअंतर्गत २५ टक्के कोट्यातून पहिल्या फेरीत २ हजार ३२५ विद्यार्थ्यांची निवड झाली होती़ त्यापैकी १ हजार ६४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला़ ५ अपात्र झाले असून ६७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही़ पहिल्या फेरीत एकूण ३ हजार २५१ प्रवेशक्षमता होती़ तर ३२३८ जागा रिक्त होत्या़जिल्ह्यात एकूण १२ हजार ९१८ जागा आहेत़ त्यापैकी २५ टक्के कोट्यातील ३ हजार २५१ जागा आरटीईसाठी आहेत़ गरिबांच्या मुलांना मोठ्या शाळेत प्रवेश मिळत आहे़नांदेड शहरात ६१९ जणांचे प्रवेशबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यातंर्गत विनाअनुदानित शाळा, कायम विनाअनुदानित शाळा व स्वयंअर्थसहायित शाळेत २५ टक्के आरटीई राखीव कोट्याची पहिली यादी मे मध्ये जाहीर झाली होती़ नांदेड शहरातील जागांची क्षमता ६३५ होती़ त्यापैकी ६२९ जागेवर ६१९ विद्यार्थी निवडले़ त्यातील २१३ जणांनी प्रवेश घेतला नाही़दुस-या यादीची प्रवेशप्रक्रिया २७ जून रोजी पूर्ण होईल़ त्या नंतर उर्वरित जागेसाठी प्रवेशप्रक्रिया होईल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून सांगण्यात आली़ शहरातील नामांकित इंग्रजी शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा, यासाठी पालक धडपड करीत आहेत़ प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कागदपत्रांची पडताळणी केली जाते़

गटशिक्षणाधिकारी दोन दिवस रजेवर होते़ तसेच बुधवारी ते औरंगाबादला सुनावणीसाठी गेले होते़ त्यामुळे पालकांची गैरसोय झाली़ मात्र २७ जून रोजी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल़ यासाठी संबंधितांना सूचना दिल्या आहेत़ - सुखदेव जाधव, सभापती, पं़ स़ नांदेड

टॅग्स :NandedनांदेडRight To Educationशिक्षण हक्क कायदाNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडEducationशिक्षण