गोदाम फोडून ४५ क्विंटल सोयाबीनची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 19:00 IST2020-11-27T18:59:32+5:302020-11-27T19:00:53+5:30

सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर व्यापाऱ्याच्या हा प्रकार लक्षात आला.

45 quintals of soybean stolen from warehouse | गोदाम फोडून ४५ क्विंटल सोयाबीनची चोरी

गोदाम फोडून ४५ क्विंटल सोयाबीनची चोरी

ठळक मुद्दे९० सोयाबीनची पोती टेम्पोमध्ये भरून चोरट्यांनी पळ काढला. 

उमरी (जिल्हा नांदेड ) : शहरातील बाजार समितीच्या आवारातील गोदाम फोडून चोरट्यांनी ४५ क्विंटल सोयाबीनची चोरी केली. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर घडली. यामुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  मार्केट यार्ड येथील व्यापारी लुखमान बेग एजाज बेग यांचे आडत दुकान आहे. तेथीलच एका शटरमध्ये त्यांनी  सोयाबीन खरेदी करून ठेवले होते. चोरट्यांनी मध्यरात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. ९० सोयाबीनची पोती टेम्पोमध्ये भरून चोरट्यांनी पळ काढला. 

सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर व्यापाऱ्याच्या हा प्रकार लक्षात आला. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , सपोनि आर. टी . शेवाळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शहरातील मुख्य रस्त्याचे कांहीं  सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पांढऱ्या रंगाचा पिकअप टेम्पो व  दुसरा एक छोटा हत्ती टेम्पो रस्त्यावरून चोरी झालेल्या  वेळेमध्ये गेल्याचे पोलिसांच्या लक्षात आले असून पुढील तपास सुरु आहे. 

Web Title: 45 quintals of soybean stolen from warehouse