शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

कंधार तालुक्यात कुष्ठरोगाचे ४०७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 7:59 PM

शहरासह ग्रामीण भागात पंतप्रधान प्रगती योजनेतंर्गत कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली.

कंधार (जि. नांदेड) : शहरासह ग्रामीण भागात पंतप्रधान प्रगती योजनेतंर्गत कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. यात १ लाख ९० हजार ३६४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात कुष्ठरोगाचे  ४०७ संशयित रूग्ण आढळल्याचे समोर आले आहे.

तालुक्यात २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर या कालावधीत कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. ग्रामीण भागातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी.ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी, कुष्ठरोग तंत्रज्ञ यांच्या सहकार्याने आशा, पुरुष स्वंयसेवक आदींनी मोहीम राबविली. विविध पथकांनी घरभेटी देऊन तपासणी केली.

बारूळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३१ हजार २१२ लोकसंख्येची तपासणी केली. त्यात ८४ संशयित रूग्ण आढळून आले. उस्माननगर केंद्रांतर्गत ३२ हजार ७३२ पैकी ९७ संशयित रूग्ण आढळले. पेठवडज अंतर्गत ३८ हजार ६६९ लोकसंख्येत ६४ संशयित, कुरूळा ३९ हजार १७ लोकसंख्येतून ५१ संशयित आणि पानशेवडी प्रा.आ. केंद्रांतर्गत ४३ हजार ९७४ तपासणी केलेल्या लोकसंख्येतून ८८ संशयित रूग्ण आढळून आले.

रासेयोचे योगदानशहरात श्री. शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.जी.आर.पगडे, उपप्राचार्य प्रा.भागवत राऊत, कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. माधव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयोचे मुले व मुली स्वंयसेवक म्हणून कुष्ठरोग शोध मोहिमेसाठी सहभागी झाले होते. मुले-मुली घरभेट देऊन या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले़ वैद्यकीय अधीक्षक डॉ.जीवनराव पावडे, पर्यवेक्षक राजेंद्र वाघमारे, आशिष भोळे यांच्या सूचनेनुसार ४ हजार ७६० लोकसंख्येची तपासणी करण्यात आली. त्यात २३ रूग्ण संशयित कुष्ठरोगी आढळले.

टॅग्स :Nandedनांदेडhospitalहॉस्पिटलmedicineऔषधं