शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड परिमंडळात ३५ हजार शेतक-यांच्या कृषिपंपाला भेटला  मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा आधार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 13:49 IST

राज्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी वसूल व्हावी, या दृष्टीने कृषीपंप वीज ग्राहकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू करून शेतक-यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देनांदेड जिल्ह्यासह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नांदेड परिमंडळामध्ये मार्च २०१७ अखेर एकूण २८२१७९ वीज ग्राहकांकडे १०८९.०३ कोटी रूपयांची मूळ थकबाकी आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रारंभी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती, आता ही मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. विहित मुदतीमध्ये या योजनेत सहभागी न होणा-या कृषीपंपधारक वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. 

नांदेड : राज्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी वसूल व्हावी, या दृष्टीने कृषीपंप वीज ग्राहकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू करून शेतक-यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. या योजनेत सहभागी होत नांदेड परिमंडळातील ३५ हजार ४१५ शेतक-यांनी चालू देयक भरून १७ नोव्हेंबरपर्यंत १० कोटी ८८ लक्ष रूपयांचे वीजबिल भरत योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रारंभी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती, आता ही मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आणखी पंधरा दिवसांचा दिलासा शेतक-यांना दिला आहे.

नांदेड जिल्ह्यासह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नांदेड परिमंडळामध्ये मार्च २०१७ अखेर एकूण २८२१७९ वीज ग्राहकांकडे १०८९.०३ कोटी रूपयांची मूळ थकबाकी असून व्याज व दंडाची रक्कम १०३२.३७ कोटी रुपये अशी एकूण २१२१.४० कोटी रूपयांची थकबाकी आहे. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होत नांदेड परिमंडळातील ३५ हजार ४१५ शेतक-यांनी चालू देयक भरून १७ नोव्हेंबरपर्यंत १० कोटी ८८ लक्ष रूपयांचे वीजबिल भरुन मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील  भोकर विभागातील २६०९ वीज ग्राहकांनी ७४ लक्ष ७८९ हजार रुपये, देगलूर विभागातील ११०८ वीज ग्राहकांनी ३० लक्ष ५६५  हजार रुपये, नांदेड ग्रामीण विभागातील २८३३ वीज ग्राहकांनी ११४ लक्ष ६७९ हजार रुपये तर नांदेड शहर विभागातील १६५७ वीज ग्राहकांनी ६२ लक्ष ३५४ हजार रूपयांचा भरणा केला आहे. नांदेड परिमंडळात सर्वाधिक भरणा हिंगोली जिल्ह्यात झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील २२१४६  वीज ग्राहकांनी ६ कोटी ७४ लाख रुपये जमा केले आहेत. त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील ५०६६ वीज ग्राहकांकडील १ कोटी ३२ लाख रूपयांचा समावेश आहे.   

अशी आहे कृषी संजीवनी योजनाकृषीपंप ग्राहकांची मूळ थकबाकी रुपये ३० हजारांपेक्षा जास्त असल्यास ती १० समान हप्त्यांमध्ये प्रत्येक दीड महिन्यांच्या     कालावधीमध्ये भरणा करावी लागेल. ३० हजारांच्या आत थकबाकी असणा-यांना थकबाकी जमा करण्यासाठी ५ हप्ते देण्यात येणार आहेत. योजनेत सहभागी होण्यासाठी चालू वीजबिल भरून डिसेंबरपासून मूळ थकबाकीपैकी २० टक्के पहिला हप्ता भरावा लागेल. त्यानंतर मार्च, जून, सप्टेंबर व डिसेंबर २०१८ पर्र्यंत प्रत्येकी २० टक्क्यांसह पूर्ण थकबाकी महावितरणकडे भरावी लागणार आहे. विहित मुदतीमध्ये या योजनेत सहभागी न होणा-या कृषीपंपधारक वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेडMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारmahavitaranमहावितरण