शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएफआय’वरील छाप्यात २० ताब्यात, मुंबई, बीडसह नांदेडमधून उचललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 05:52 IST

मुंबई, नवी मुंबई, भिवंडीतही तपास यंत्रणेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड/औरंगाबाद : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, परभणी, जालना, बीड या जिल्ह्यांमधून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेशी संबंधित अकराजणांना ताब्यात घेतले आहे. यात औरंगाबाद आणि परभणीतून प्रत्येकी चार, तर नांदेड, जालना आणि बीड येथून प्रत्येकी एकाला ताब्यात घेतले.  

नांदेडच्या देगलूर नाका भागातून मोहम्मद मेराज अन्सारी या पीएफआयच्या सदस्याला ताब्यात घेतले. अन्सारी याचे भागात किराणा आणि इतर वस्तू विक्रीचे दुकान आहे. परभणीतून अब्दुल सलाम (३४), मोहम्मद निसार (४१), मोहम्मद जाविद (३५), अब्दुल करीम (३५) या चौघांना एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले. या पाचही आरोपींना न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आबेद अली हा सहावा आरोपी फरार आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या औरंगाबाद शाखेचा माजी जिल्हाध्यक्ष इरफान मिल्ली, परवेज खान, फैसल सय्यद खलील आणि नासीर नदवी यांना एटीएस आणि एनआयएच्या पथकाने जिन्सी भागातून अटक केली. त्याशिवाय जालना येथील ट्रान्स्पोर्टचा व्यावसायिक अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन (३२, रा. रहमान गंज) यासही जळगाव येथून अटक केली. मोमीन या संघटनेचा खजीनदार आहे.   बीडमधून पीएफआय संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्ष वसीम अजीज शेख (३०, रा. जुना बाजार, बीड) यास ताब्यात घेतले. पीएफआय संघटनेच्या मूळ पदाधिकाऱ्यांपैकी एक म्हणून वसीम शेखची ओळख आहे.नाशिक : मालेगावमधील  पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले. संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष मौलाना सैफूर रहमान (रा. गल्ली क्रमांक दोन, हुडको कॉलनी)  यांना ताब्यात घेतले.

मुंबई, पुणे, कोल्हापुरात कारवाई; नऊजण ताब्यातमुंबई : पीएफआयवर केलेल्या कारवाईत एटीएसने मुंबईतून ५ जणांना अटक केली. यामध्ये कुर्ला, मालाड, कांदिवलीसह विविध भागांतील सदस्यांचा समावेश आहे. पाचही जणांना २६ सप्टेंबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.नवी मुंबई : नेरूळमधील सेक्टर २३ येथील पीएफआयच्या कार्यालयावर छापा टाकला. सुमारे आठ तासांच्या झाडाझडती नंतर पनवेलच्या बंदर रोड येथून असीम अधिकारी याला ताब्यात घेतले आहे. नेरूळच्या कार्यालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आसिफ शेख यांना पहाटे चारच्या सुमारास घरातून ताब्यात घेतले.भिवंडी : शहरातील बंगालपुरा येथील मोईनुद्दीन मोमीन या युवकाला ठाणे येथील दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले.कोल्हापूर : सिरत मोहल्ला परिसरातील एका संशयितास मध्यरात्री झोपेतूनच ताब्यात घेतले. मौला नबीसाब मुल्ला (वय ३८) असे त्याचे नाव आहे. पुणे : दहशतवाद विरोधी पथकाने पहाटे कोंढवा येथून पीएफआयच्या दोघांना अटक केली. अब्दुल कय्युम शेख  आणि रजी अहम खान (दोघेही रा. कोंढवा) अशी त्यांची नावे आहेत. 

टॅग्स :PoliceपोलिसraidधाडTerrorismदहशतवादCrime Newsगुन्हेगारी