शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

१७०० जात प्रमाणपत्रांचे पडताळणी प्रस्ताव प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 19:38 IST

उच्च शिक्षणासाठीच्या विद्यार्थ्यांची ससेहोलपट

ठळक मुद्देअधिकाऱ्यांची वानवा असल्याने विलंब

नांदेड : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात अधिकाऱ्यांचा वाणवा असल्याने प्रमाणपत्र पडताळणीसाठी विलंब लागत असून शैक्षणिक विभागाचे १ हजार ७१८ प्रमाणपत्र प्रलंबित आहेत़ 

उच्च शिक्षणासाठी तसेच विविध शिष्यवृत्ती योजनेसाठी  जात प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे़ शासनाने जात प्रमाणपत्रांची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन केली आहे़ महा- ई - सेवा केंद्रात आवश्यक कागदपत्रे जमा करून तेथूनच दाखला डाऊनलोड करून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ पण जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रस्ताव दाखल केल्यानंतर सदर प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत आहे़  या कार्यालयात असलेले संशोधन अधिकारी तथा समिती सदस्य सचिव यांच्याकडेच पडताळणीचे काम सोपविले आहे़ दक्षता समितीवर डीवायएसपी, पोलीस निरिक्षक, फौजदार, पोलीस शिपाई यांची नियुक्त केली असली तरी या समितीवर सध्या एक पोलीस शिपाई व  पोलीस निरिक्षकाकडे डीवायएसपीचा कार्यभार सोपविण्यात आला आहे़  तसेच एक सिनियर क्लार्कचे पद रिक्त असून १० कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत़ दिवसेंदिवस  शैक्षणिक, सेवापूर्व, सेवातंर्गत, निवडणूक, जात दाखल्याची अपील प्रकरणे, तक्रार प्रकरणे व इतर प्रस्तावांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यात कर्मचारी कमी असल्याने   प्रलंबित प्रमाणपत्रांची संख्या अधिक होत आहे़ 

विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी अत्यावश्यक असलेल्या  जात प्रमाणपत्र पडताळणीचे डिसेंबर २०१९ अखेर २ हजार ८६९ प्रकरणे प्रलंबित होते़ ३१ जानेवारी अखेर ७९९ प्रकरणे दाखल झाले होते़ असे एकुण ३ हजार ६६८ प्रस्ताव होते़ त्यापैकी १ हजार ३५० वैद्य ठरले तर इतर कारणांनी ६०० प्रमाणपत्र निकाली काढण्यात आले़ सध्या १ हजार ७१८ प्रमाणपत्रे प्रलंबीत  आहेत़ सेवांतर्गत विभागातील २१० प्रकरणे, निवडणूक ३६, जाती दाखल्याची अपील प्रकरणे २, सेवापूर्व ४, तक्रार प्र्रकरणे १ व इतर ४२ प्रकरणे असे मिळून एकुण २ हजार २२  प्रकरणे प्रलंबित आहेत़ दरम्यान, ३० जुलै २०११ ते  ३१ आॅगस्ट २०१२ या कालावधीत निर्गमित केलेल्या जात वैद्यता प्रमाणपत्रांची फेर तपासणी करण्याबाबत आदेश देण्यात आल्यामुळे  या प्रमाणपत्रांच्या पडताळणीचे काम  सध्या सुरू असल्याची माहिती  संशोधन अधिकारी ए़ बी़ कुंभारगावे यांनी दिली़ 

नांदेडसह हिंगोली, परभणी, वाशिमचा कारभारनांदेडच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने अतिरिक्त पदभार स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांकडून पडताळणीचे काम सुरू आहे़ या कार्यालयातील आयुक्तांकडे परभणी, हिंगोली, वाशिम व नांदेड या चार जिल्ह्याचा पदभार आहे़ तर हिंगोलीचे मुळपद असलेल्या उपायुक्तांकडे परभणी, नांदेडचे अतिरिक्त पद देण्यात आले आहे़ 

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रNandedनांदेडStudentविद्यार्थी