शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

रविवारी नांदेड विभागातील १५ रेल्वेगाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 9:21 PM

दोन दिवसांत ३४ गाड्या अंशत: रद्द

ठळक मुद्देदुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात  प्रवाशांना आवाहन

नांदेड : दमरेच्या नांदेड विभागातील परभणी- मुदखेड दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून सिंग्नलिंग आणि इतर कामांसाठी ९ दिवसांचा लाईन ब्लॉक घेण्यात येत आहे़ त्यामुळे शनिवारी आणि रविवारी जवळपास ३४ गाड्या अंशत: रद्द तर रविवारी १५ गाड्या पूर्णत: रद्द केल्या आहेत़  

मुदखेड ते परभणी असे ८१़४३ किलोमीटर दुहेरीकरणातील लिंबगाव - चुडावा - पूर्णा - मिरखेलदरम्यान ३१़९३ किलोमीटरचे काम पूर्ण करणे, सिग्नलिंग व रेल्वेपटरी आपसात जोडणे आदी कामांसाठी हा ब्लॉक असून १८ फेब्रुवारीपर्यंत राहील़  शनिवारी नॉन- इंटरलॉक ब्लॉक घेण्यात येईल़ परिणामी काचीगुडा ते नगरसोल सवारी गाडी शनिवारी काचीगुडा ते माळटेकडी अशी धावेल. या गाडीचा रिकामा रेक मालटेकडी येथूनच काचीगुडा असा धावेल.

नगरसोल-काचीगुडा सवारी गाडी परभणीपर्यंतच धावेल. गाडी संख्या ५७५६१ आणि ५७५६२  गाडी परभणी ते मालटेकडी दरम्यान रद्द असेल़ नगरसोल ते नांदेड सवारी गाडी परभणीपर्यंतच धावेल. काचीगुडा ते नरखेड इंटरसिटी एक्स्प्रेस नांदेड पर्यंतच धावेल. 

परतीसाठी नांदेड येथून सुटेल. नरखेड ते काचीगुडा  इंटरसिटी एक्स्प्रेस वसमतपर्यंतच धावेल. येथून या गाडीचा रिकामा रेक वसमत ते नरखेड असा धावेल. म्हणजेच शनिवारी गाडीसंख्या १७६४१ व १७६४१ ही गाडी नांदेड-वसमत-नांदेड दरम्यान रद्द असेल.       

आदिलाबाद ते परळी पूर्णा -पर्यंतच धावेल. पूर्णा ते परळी दरम्यान रद्द असेल. आदिलाबाद ते पूर्णा गाडी मुदखेड पर्यंतच धावेल.  मुदखेड ते पूर्णा दरम्यान रद्द असेल.

अकोला ते पूर्णा गाडी वसमत पर्यंतच धावेल. वसमत ते पूर्णा दरम्यान रद्द असेल. अकोला ते परळी गाडी वसमतपर्यंतच धावेल. वसमत ते परळी दरम्यान रद्द असेल. परळी ते अकोला वसमतपासूनच सुटेल. परळी ते वसमत दरम्यान सेवा रद्द राहील़ पूर्णा ते आदिलाबाद ही गाडी मुदखेड ते आदिलाबाद अशी धावेल. पूर्णा ते मुदखेड दरम्यान रद्द असेल. हैदराबाद ते पूर्णा गाडी परभणीपर्यंतच धावेल. परभणी ते पूर्णादरम्यान रद्द असेल.

पूर्णा ते अकोला गाडी वसमत येथूनच सुटेल म्हणजेच वसमत ते अकोलादरम्यान रद्द असेल.रविवारी काचीगुडा ते नगरसोल सवारी गाडी काचीगुडा ते मालटेकडी अशी धावेल. नगरसोल-काचीगुडा सावारी गाडी परभणीपर्यंतच धावेल.  

हैदराबाद - परभणी पॅसेंजर  हैदराबाद येथून सुटलेली आणि नांदेड रेल्वे विभागात ९ फेब्रुवारीला येणारी नांदेडपर्यंतच धावेल. नांदेड ते परभणी दरम्यान रद्द असेल. आदिलाबाद-परळी सवारी गाडी नांदेडपर्यंतच धावेल. नांदेड ते परळी दरम्यान रद्द असेल. अकोला-पूर्णा ८ फेब्रुवारी रोजी अकोला येथून सुटलेली गाडी  वसमतपर्यंतच धावेल. वसमत ते पूर्णा दरम्यान रद्द असेल.

अकोला ते परळी गाडी हिंगोली पर्यंतच धावेल. नांदेड ते बंगलोर एक्स्प्रेस ९ फेब्रुवारी रोजी नांदेडऐवजी परभणी येथून सुटेल. नांदेड - श्रीगंगानगर सुपरफास्ट  एक्स्प्रेस नांदेड ऐवजी वसमत येथूनच सुटेल.  दौंड ते नांदेड दौंड येथून शनिवारी निघेल ती परभणीपर्यंतच धावेल. 

परळी ते अकोला परळीऐवजी हिंगोली येथूनच सुटेल.  पूर्णा ते आदिलाबाद पूर्णाऐवजी नांदेड येथून सुटेल.  हैदराबाद ते पूर्णा परभणी पर्यंतच धावेल. बंगळुरु-नांदेड एक्स्प्रेस जी बंगळुरु येथून शनिवारी सुटेल आणि परभणी येथे रविवारी पोहोचेल़ ती परभणीपर्यंतच धावेल. पूर्णा ते अकोला पूर्णाऐवजी वसमत येथून सुटेल़ 

पूर्णत: रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यारविवारी नॉन- इंटरलॉक ब्लॉक घेण्यात येईल़ त्यामुळे जवळपास १५ गाड्या पूर्णत: रद्द करण्यात आल्या आहेत़ यामध्ये  गाडी संख्या ५१४३३ निझामाबाद - पंढरपूर, ५७५४२ नांदेड - नगरसोल, ५७५१६ नांदेड-दौंड, ५१४३४ पंढरपूर - निझामाबाद, ५७५२२ पूर्णा-परळी, ५७५२१ परळी ते पूर्णा, ५७५९३ मेद्चल ते नांदेड, ५७५४८ पूर्णा-हैदराबाद, १२७६५ तिरुपती-अमरावती पूर्णत: रद्द केली आहे़ तसेच सुपरफास्ट एक्स्प्रेस ८ फेब्रुवारी रोजी तिरुपती येथून निघणारी आणि ९ फेब्रुवारी रोजी नांदेड विभागात पोहोचणारी पूर्णत: रद्द असेल़ अदिलाबाद-पूर्णा, पूर्णा - अकोला, नांदेड-मेद्चल, नगरसोल-नांदेड, परभणी ते नांदेड, परळी-आदिलाबाद पूर्णत: रद्द राहिल़ ४नगरसोल ते नांदेड सवारी गाडी परभणीपर्यंतच धावेल. काचीगुडा ते नरखेड इंटरसिटी एक्स्प्रेस नांदेडपर्यंतच धावेल.आणि या गाडीचा रिकामा रेक नांदेड ते काचीगुडा इंटरसिटी एक्स्प्रेस बनून नांदेड येथून सुटेल नरखेड ते काचीगुडा इंटरसिटी एक्स्प्रेस वसमतपर्यंतच धावेल. वसमत येथून या गाडीचा रिकामा रेक वसमत ते नरखेड असा धावेल.  

बंगळुरु- नांदेड (१६५९४) एक्स्प्रेस शनिवारी परभणी स्थानकावर रोखण्यात येईल. परभणी ते नांदेडदरम्यान रद्द असेल. तसेच औरंगाबाद ते नांदेड विशेष गाडी परभणीपर्यंतच धावेल. परभणी ते नांदेडदरम्यान रद्द असेल. श्री गंगानगर-नांदेड (१२४४०) एक्स्प्रेस वसमत येथेच थांबेल.वसमत ते नांदेड दरम्यान रद्द करण्यात आली आहे़ 

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीtourismपर्यटनNandedनांदेड