शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
2
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
3
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
4
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
5
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
6
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
7
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
8
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
9
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
10
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
11
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
12
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
13
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
14
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
15
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
16
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
17
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
18
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
19
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
20
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव

नांदेड - देगलूर बस अपघातात १५ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:23 AM

नांदेडहून देगलूरला जाणारी बस ट्रकच्या धडकेने उलटली. यामध्ये चालक, वाहक यांच्यासह जवळपास १५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सकाळी नांदेड शहराजवळील धनेगाव चौकात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेडहून देगलूरला जाणारी बस ट्रकच्या धडकेने उलटली. यामध्ये चालक, वाहक यांच्यासह जवळपास १५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सकाळी नांदेड शहराजवळील धनेगाव चौकात घडली.शनिवारी सकाळी देगलूर आगाराची बस (क्रमांक एम एच १४ बीटी १५६७) नांदेड येथून देगलूरकडे निघाली. दरम्यान, धनेगाव बायपास मार्गे नांदेड शहरात येणाऱ्या (एमएच-४२ बी-९७७५) या ट्रकने धनेगाव चौकात सदर बसच्या डाव्या बाजूने जोराची धडक दिली.यात बस उलटून जवळपास १५ प्रवासी आणि चालक, वाहक जखमी झाले आहेत. या अपघातात मोहमद आजम मोहमद खान कासिम, हनुमंत पडलवार, संभाजी शिंदे-गोळेगाव ता. लोहा, भाऊराव डोबाडे-धनेगाव, गणेश इबितवार-बिलोली, शंकर फुलारी-करडखेड ता. देगलूर, माधव देवकत्ते-चौफाळा ता. मुखेड, सदाशिव पाटील, पांडुरंग भोंग-काजाळा ता. लोहा, शेख बशीरलाल अहेमद- घुंगराळा ता. नायगाव, गंगाधर देशमुख-गोळेगाव ता. लोहा यांच्यावर शासकीय रुग्णालयात तर सीताबाई मंडळे-गोकुळनगर, नांदेड, यमुनाबाई वाडेकर-गोकुळनगर, नांदेड यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. शासकीय रूग्णालयातील काही रूग्णांवर उपचार करून सुटी देण्यात आली़ दरम्यान, बसमधील इतर प्रवासी सुखरूप आहेत.अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व प्रवाशांना बसबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, एस.टी.चे विभागीय वाहतूक अधिकारी अविनाश कचरे, आगार व्यवस्थापक व्यवहारे, कांबळे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तसेच तातडीने रुग्णालयात जाऊन जखमींची आणि नातेवाईकांची विचारपूस केली. त्याचबरोबर जखमींना तात्काळ मदत म्हणून प्रत्येकी पाचशे ते हजार रूपये रोख देण्यात आले़

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघातhospitalहॉस्पिटल