झोका खेळताना साडीचा फास गळ्याभोवती आवळल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 13:52 IST2019-12-12T13:45:47+5:302019-12-12T13:52:26+5:30

साडीच्या झोक्यावर खेळत असताना झाला अपघात

14-year-old boy dies after hanging sari around his neck while playing Zula | झोका खेळताना साडीचा फास गळ्याभोवती आवळल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

झोका खेळताना साडीचा फास गळ्याभोवती आवळल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

ठळक मुद्देखेळत असताना साडीचा झोका गळ्याभोवती आवळला गेला

हिमायतनगर (जि. नांदेड) : घरातील आडूला बांधलेल्या झोक्यात बसून खेळताना साडीचा फास गळ्याभोवती आवळल्याने समाधान शिवाजी मिराशे (१४) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी ८.३० वा. हिमायतनगर तालूक्यातील पळसपूर येथे घडली.

मुळ गांजेगाव येथील रहिवासी समाधान मिराशे हा मामाकडे पळसपूर येथे राहून हिमायतनगर येथील राजाभगिरथ विद्यालयात इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता. बुधवारी सकाळी तो घरी खेळत असतांना घरात आडूला बांधलेल्या साडीच्या झोक्यावर बसला असता अचानक साडीचा झोका समाधानच्या गळ्याभोवती आवळला गेला. या घटनेत समाधानचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती पोलीस पाटील शंकरराव वानखेडे यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: 14-year-old boy dies after hanging sari around his neck while playing Zula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.