शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या १२ विशेष गाड्या; नांदेड विभागातून धावणार ८ गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 7:46 PM

पंढरपूर येथे २३ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रे निमित्त दक्षिण मध्य रेल्वे ने १२ विशेष गाड्या चालवण्याचे ठरविले आहे.

नांदेड : पंढरपूर येथे २३ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रे निमित्त दक्षिण मध्य रेल्वे ने १२ विशेष गाड्या चालवण्याचे ठरविले आहे. या पैकी नांदेड विभागातून ८ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने नांदेड विभागाने नियोजन केले आहे.

गाडी संख्या ०७५०१ / ०७५०२ आदिलाबाद-पंढरपूर-आदिलाबाद गाडीच्या दोन फेऱ्या होतील. त्यानुसार गाडी संख्या ०७५०१ आदिलाबाद – पंढरपूर विशेष गाडी आदिलाबाद येथून दिनांक २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता सुटेल. ही गाडी किनवटला सकाळी १०.१४ वाजता, नांदेड दुपारी १.०५ वाजता, परभणी २.२७ वाजता, परळी ४.१० वाजता लातूर ७.०९ वाजता निघून पंढरपूर येथे रात्री ११.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०७५०२ पंढरपूर ते आदिलाबाद हि विशेष गाडी २४ जुलै पंढरपूर येथून सकाळी ५.३० वाजता सुटेल लातूर, परळी दुपारी १.३०, परभणी -३.०५ वाजता, नांदेड येथे दुपारी ४.१० वाजता पोहोचेल आणि भोकर-५.२२, किनवट-७.२२ वाजता तर आदिलाबाद येथे रात्री ८.४० वाजता पोहोचेल. या गाडीला १० डब्बे असतील.

गाडी संख्या ०७५१५/ ०७५१६ नगरसोल -पंढरपूर- नगरसोल गाडीच्या २ फेऱ्या होतील. यात गाडी संख्या ०७५१५ नगरसोल– पंढरपूर विशेष गाडी नगरसोल येथून दिनांक २२ जुलै  रोजी सायंकाळी ५.३० वाजता सुटून रोटेगाव, परसोडा, लासूर मार्गे औरंगाबाद येथे ६.५० वाजता पोहोचून ७.०५ वाजता सुटेल. जालना येथे ८.२० वाजता, परतूर, सेलू, मानवत रोड मार्गे परभणी येथून २३ जुलै रोजी मध्यरात्री १२.५० वाजता सुटेल, पुढे गंगाखेड -१.४५ , परळी- २.४५ वाजता सुटून लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी मार्गे हि गाडी पंढरपूर येथे दिनांक २३ जुलै रोजी सकाळी १०.०५ वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०७५१६  पंढरपूर-नगरसोल हि विशेष गाडी पंढरपूर येथून दिनांक २४ जुलै रोजी रात्री ११.५० वाजता सुटेल आणि दिनांक २५ जुलै रोजी परळी-०७.०० वाजता, परभणी-८.३०, जालना-१०.५४, औरंगाबाद येथे सकाळी ११.४० वाजता पोहोचेल आणि ११.४५ वाजता सुटून नगरसोल येथे दिनांक २५ जुलै  रोजी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. या गाडीला एकूण १० डब्बे असतील.

गाडी संख्या ०७५२३/०७५२४ अकोला-पंढरपूर-अकोला या गाडीच्यादेखील दोन फेऱ्या होणार आहेत. गाडी संख्या ०७५२३ अकोला – पंढरपूर विशेष गाडी अकोला  येथून दिनांक २२ जुलै रोजी रात्री ८.१० वाजता सुटेल. पुढे वाशीम येथे रात्री ९.२५ , हिंगोली-१०.०६ , पूर्णा-११.५५ परभणी येथे दिनांक २३ जुलै रोजी रात्री साडेबारा वाजता पोहोचेल. हि गाडी परभणी येथे नगरसोल-औरंगाबाद येथून येणाऱ्या गाडी संख्या ०७५१५ या गाडीला जोडण्यात येईल. पुढे हि गाडी ०७५१५ बनूनच पंढरपूर येथे सकाळी १०.०५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी परभणीपर्यंत ०७५१६ बनून येईल आणि परभणी येथून अकोला कडे जाणारे डब्बे वेगळे करून गाडी संख्या ०७५२४ रात्री ८.१७ वाजता सुटेल आणि अकोला येथे दुपारी १.१५ वाजता पोहोचेल. या गाडीला १० डब्बे असतील.

त्याचबरोबर बिदर -पंढरपूर-बिदर या मार्गावर दोन फेऱ्या होतील. यामध्ये गाडी क्रमांक ०७५१७ / ०७५१८ ही विशेष गाडी दिनांक २२ जुलै रोजी दुपारी बिदर येथून ३.४५ वाजता सुटेल आणि भालकी, कमलानगर, उदगीर, लातूर रोड ला सायंकाळी ६ वाजता पोहोचेल. पुढे हि गाडी आदिलाबाद-पंढरपूर विशेष गाडीला लातूर रोड येथे जोडण्यात येईल आणि पुढे हि गाडी आदिलाबाद-पंढरपूर विशेष गाडी बनूनच धावेल. हि गाडी पंढरपूर येथे रात्री ११.३० वाजता पोहोचेल. तसेच या गाडीचे डब्बे पंढरपूर – आदिलाबाद विशेष गाडीला जोडून लातूर रोड पर्यंत येतील आणि लातूर रोड येथे ते वेगळे करून पुढे हि गाडी  ०७५१८ लातूर रोड येथून विशेष गाडी बनून दिनांक २५ तारखेला सकाळी १०.१७ वाजता लातूर रोड येथून सुटेल आणि उदगीर, कमलानगर, भालकी मार्गे बिदर येथे दुपारी १.२० वाजता पोहोचेल.

गाडी संख्या ०७५२१/०७५२२ पंढरपूर -बिदर - पंढरपूर अशा दोन फेऱ्या होतील. गाडी संख्या ०७५२१ ही गाडी २३जुलै रोजी सकाळी ५.३० वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि कुर्डूवाडी, बार्शी , उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, उदगीर, कमलानगर, भालकी मार्गे बिदर येथे दुपारी १.३० वाजता पोहोचेल.  परतीच्या प्रवासात २३ जुलै रोजी च गाडी संख्या ०७५२२ बिदर येथून सायंकाळी ४ वाजता सुटून भालकी, कमलनगर, उदगीर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डूवाडी मार्गे पंढरपूर येथे रात्री ११.३० वाजता पोहोचेल.

या गाडीला २० डब्बे असतील.गाडी संख्या ०७५१९/०७५२० पंढरपूर -बिदर - पंढरपूर ही विशेष गाडी दिनांक २३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि कुर्डूवाडी, बार्शी , उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, उदगीर, कमलानगर, भालकी मार्गे बिदर येथे सायंकाळी ७.१५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात २४ जुलै रोजी हि गाडी संख्या ०७५२० बिदर येथून दुपारी २.३०  वाजता सुटून भालकी, कमलनगर, उदगीर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डूवाडी मार्गे पंढरपूर येथे रात्री ११.१० वाजता पोहोचेल. सदर गाडीला एकूण २० डब्बे असतील, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी कळविली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूर