किनवट तालुक्यातील ४ मंडळातील ११६ गावे दुष्काळग्रस्तांच्या यादीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:52 IST2019-03-02T00:51:58+5:302019-03-02T00:52:41+5:30
किनवट तालुक्यातील उर्वरित म्हणजे चार मंडळातील ११६ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली. ‘लोकमत’ने यासंदर्भात वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते.

किनवट तालुक्यातील ४ मंडळातील ११६ गावे दुष्काळग्रस्तांच्या यादीत !
किनवट : किनवट तालुक्यातील उर्वरित म्हणजे चार मंडळातील ११६ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली. ‘लोकमत’ने यासंदर्भात वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते.
तालुक्यात २०१८ च्या पावसाळ्यात धरसोड पद्धतीने पाऊस झाला़ त्यामुळे खरिपाचा उतारा प्रचंड घटला आणि तालुक्यावर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती़ विदर्भाच्या सीमेवरील किनवट तालुक्यातील केवळ तीन मंडळ दुष्काळसदृश्य म्हणून जाहीर केले होते़ मात्र उर्वरित चार मंडळे दुष्काळाच्या यादीत न घेतल्याने सलग चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणारे शेतकरी हवालदिल झाले होते़ शासनाने २१ फेब्रुवारी २०१९ शासन निर्णयानुसार २०१८ -१९ च्या खरीप हंगामात पन्नास टक्क्यांपेक्षा कमी अंतिम पैसेवारी असलेल्या किनवट तालुक्यातील उर्वरित चार मंडळांतील ११६ गावे दुष्काळसदृश्य म्हणून घोषित करण्यात आली व त्या गावांना सवलती लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडने २५ फेब्रुवारी २०१९ रोजी काढलेल्या पत्रात म्हटले आहे़