शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वाआयुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. ओबीसी आरक्षित जागांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:08 IST

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ६ जिल्हा परिषदेतील ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. ...

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ६ जिल्हा परिषदेतील ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयात दुरुस्ती करावी यासाठी नागपूर जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. सोमवारी त्यावर सुनावणी होणार आहे. न्यायालय त्यावर काय निर्णय देते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेतील राजकीय आरक्षण ५० टक्क्यांच्या वर गेले. ओबीसी वर्गातील जागा रिक्त करून ५० टक्क्यांनुसार आरक्षण निश्चित करून निवडणुका घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार व पालघर या सहा जिल्हा परिषद व पंचायत समितींमधील ओबीसी वर्गातील जागा रिक्त करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत याचे पडसाद उमटल्याचे सांगण्यात येते. नागपूर जिल्हा परिषदेमधील सदस्यत्व रद्द झालेल्या काही सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आव्हान याचिका दाखल केली. दुसरीकडे जिल्हा परिषदेचे बजेट येत्या १६ मार्च रोजी सादर होणार आहे. प्रशासनही आपल्या प्रशासकीय कामकाजात व्यस्त असून, वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. वरच्या पातळीवरून येतील त्या आदेशाची अंमलबजावणी करू, अशी भूमिका प्रशासनाची आहे.

- सरकारकडूनही हालचाल नाही

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला सरकार आव्हान देईल, अशी अपेक्षा सदस्यत्व रद्द झालेल्या सदस्यांकडून व्यक्त केली जात होती. सूत्रांच्या माहितीनुसार अद्याप सरकारने या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली नाही. सरकारला निवडणुका हव्या असल्याने ते सर्वोच्च न्यायालयात गेले नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

- गट नेतेपदी वर्णी कुणाची?

जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा १६ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. सभेच्या आधीच गटनेत्याची नियुक्ती किंवा तात्पुरती नियुक्ती करावी लागाणार असल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेत्यांचेही सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामुळे या पदावर पक्ष कुणाची नियुक्ती करते हे बघणे महत्त्वाचे आहे.