शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचा गृहपाल जेरबंद

By admin | Updated: December 16, 2015 03:17 IST

वसतिगृहात मेस चालविणाऱ्या बचत गटाच्या महिला सचिवास ५० हजारांची लाच मागणाऱ्या लोकसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी सकाळी जेरबंद केले.

५० हजारांची लाच स्वीकारली : एसीबीने बांधल्या मुसक्या नागपूर : वसतिगृहात मेस चालविणाऱ्या बचत गटाच्या महिला सचिवास ५० हजारांची लाच मागणाऱ्या लोकसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी सकाळी जेरबंद केले. कैलास अरुण उईके (वय ३८) असे आरोपीचे नाव असून तो कळमन्यातील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात गृहपाल(वॉर्डन) म्हणून कार्यरत आहे. त्याला एसीबीच्या कोठडीत पोहचविणाऱ्या महिलेचे नाव अपेक्षा उपरे असून, त्या महिला बचत गटाच्या सचिव आहेत. हा बचत गट आदिवासी मुलांच्या वसतिगृहात मेस चालवितो. त्याबाबतचे सप्टेंबर, आॅक्टोबरचे २०१५ च्या चार बिलांची रक्कम वसतिगृहाकडे थकीत होती. त्यातील तीन बिले आरोपी उईकेने काढून दिली. चौथे बिल रोखत त्याने ५० हजारांची लाच मागितली. एकमुस्त ५० हजारांची लाच दिल्याशिवाय चौथे बिल काढून देणार नाही, अशी अडेलतट्टू भूमिका उईकेने घेतली होती. त्यामुळे उपरे यांनी एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांची भेट घेतली. त्यांनी तक्रार नोंदवून घेतल्यानंतर आरोपी उईकेच्या मुसक्या बांधण्यासाठी सापळा लावला. मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास लाचेची ५० हजारांची रक्कम घेऊन उपरे वसतिगृहात गेल्या. बाजूला एसीबीचे पथक दबा धरून बसले. आरोपी उईकेने लाच स्वीकारताच पोलीस निरीक्षक युवराज पत्की, हवालदार दिलीप जाधव, शंकर कांबळे, महिला शिपाई कोमल गुजर यांनी त्याच्या मुसक्या बांधल्या.(प्रतिनिधी)