शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईची पसंती शासकीय नोकरीलाच

By admin | Updated: May 19, 2014 00:50 IST

काही वर्षांअगोदर युवकांमध्ये ‘फेव्हरेट’ असणार्‍या खासगी नोकरीचे आकर्षण आता हळूहळू कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासकीय नोकरीतील सुविधा, सवलती

नागपूर : काही वर्षांअगोदर युवकांमध्ये ‘फेव्हरेट’ असणार्‍या खासगी नोकरीचे आकर्षण आता हळूहळू कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासकीय नोकरीतील सुविधा, सवलती आणि सिक्युरिटीमुळे तरुणाईचा सरकारी नोकरीकडे ओढा वाढत आहे. खासगी जॉबमध्ये दांडगे वेतन मिळत असले तरी कामाचा अतिरिक्त ताणदेखील सहन करावा लागतो. शिवाय नोकरी टिकेलच याची शाश्वतीदेखील नसते. परिणामी अभियांत्रिकी, व्यवस्थापन अभ्यासक्रमातील उच्चशिक्षित विद्यार्थीदेखील शासकीय नोकर्‍यांना पसंती देत आहेत. लाखो रुपयांचे पॅकेज देऊन खासगी कंपन्या युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असतात. विविध महाविद्यालयांतून कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून खासगी कंपन्या आवश्यक नोकर भरती करताना दिसतात. यासाठी शिकाऊ उमेदवारांनाही तीन ते पाच लाखांपर्यंतचे पॅकेज दिले जाते. मात्र, असे असतानाही शहरातील बहुतांश महाविद्यालयीन तरुणांना दांडग्या पगाराच्या खासगी नोकर्‍यांची नव्हे तर शासनाच्या विविध विभागांतील प्रशासकीय नोकर्‍या करण्याची आवड असल्याचे विद्यार्थी सांगतात. खासगी जॉबसाठी मोठे पॅकेज मिळत असले तरी त्या तुलनेत कामाचा बोजा फार जास्त असतो. खासगी कंपन्यांकडून नोकरदारांना सिक्युरिटी दिली जात नसल्याने कंपनीप्रति कर्मचार्‍यांना आपलेपणा वाटत नाही. शिवाय कंपनी केव्हाही नोकरीवरून काढू शकते. बेरोजगारांची संख्या जास्त असल्याने खासगी क्षेत्रात कर्मचार्‍यांकडून कमी पगारात जास्त काम करून घेतले जाते. अशा परिस्थितीत कर्मचार्‍यांची गुणवत्ता तर खालावतेच; शिवाय त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक परिणामदेखील होतो. शासकीय आणि खासगी नोकर्‍यांतील चांगल्या-वाईट गोष्टींबद्दलची जाणीव, फायदे-तोटे युवकांना माहिती होत आहेत. मानसिक समाधान आणि सुरक्षा देणार्‍या नोकर्‍यांकडे आजच्या युवकांचा कल असल्याचे लक्षात येते. शासकीय नोकरीमध्ये सुविधा असतात आणि सुरक्षादेखील. वेतनासह विविध प्रकारचे भत्तेही मिळत असतात. शिवाय खासगी कंपन्यांप्रमाणे कामाचे टेन्शन, टार्गेट नसल्याने युवकांना सरकारी नोकर्‍या आकर्षित करीत आहेत. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाप्रमाणे विविध विभागांतील पदे सरळ भरती प्रक्रियेच्या माध्यमातून निवडले जातात. यामुळे प्रक्रियेत एक प्रकारची पारदर्शकता आली असून युवकांचा विश्वास यातून संपादन झाला आहे. शिवाय शासकीय नोकर्‍या या वशिला आणि शिफारशींऐवजी गुणवत्तेवर मिळत असल्याने तरुणाईचा अशा परीक्षा देण्याकडे कल वाढला असल्याचेही दिसून येते. (प्रतिनिधी)