शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

आमराई फुलविण्यासाठी तरुणाई सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 00:02 IST

तरुणांनी आंब्याच्या कोय जमा करून वस्त्यांमध्ये, घरोघरी आणि मैदानात आंबा लागवड सुरू केली असून, येत्या पाच वर्षांत आमराई विकसित करण्याचे ध्येय बाळगले आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मोबाईल, इंटरनेटच्या दुनियेत वावरताना करियरकडे लक्ष ठेवणारी तरुणाई पर्यावरणबाबतही तेवढीच सजग असल्याचे दिसून येते. ही सजगता बाळगून पर्यावरण संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबविण्याची उदाहरणे समोर येतात. अशाच काही तरुणांनी चालविलेले एक अभियान सध्या लक्षवेधी ठरत आहे. हे अभियान आहे शहरात आमराई फुलविण्याचे. होय, या तरुणांनी आंब्याच्या कोय जमा करून वस्त्यांमध्ये, घरोघरी आणि मैदानात आंबा लागवड सुरू केली असून, येत्या पाच वर्षांत आमराई विकसित करण्याचे ध्येय बाळगले आहे.ग्रोविल फाऊंडेशनच्या माध्यमातून आमराई घडविण्याचे अभियान राबविण्यात आले आहे. या ग्रुपचा सक्रिय सदस्य आणि इंटेरियर डिझायनर असलेला आकाश जगताप यांनी या अभियानाबाबत लोकमतला माहिती दिली. या ग्रुपमध्ये सध्या १५० च्यावर सक्रिय सदस्य आहेत. या मित्रांनी उन्हाळा सुरू झाल्यापासून हे अभियान चालविले. आंबा खाल्ला किंवा घरी रस बनविला की कोय फेकून देण्याची सवय असते. ग्रुपच्या मित्रांनी सुरुवातीला या कोय जमा करण्यासह जवळचे मित्र, नातेवाईक यांना जागृत करण्याचे काम सुरू केले. आंब्याची कोय फेकण्याऐवजी ती घरी, आसपास, वस्तीत किंवा जवळच्या उद्यान, मैदानात लावावी असे आवाहन केले. पाहता पाहता १५० च्यावर सदस्य जुळले. यांनी मिळेल त्या ठिकाणी कोय लागवड केली.१५ ऑगस्टला महाअभियानविशेष म्हणजे या ग्रुपच्या सदस्यांकडे ९०० ते १००० आंब्याच्या कोय सध्या जमा आहेत. अभियानाशी जुळलेल्या कल्याण मित्र एनजीओच्या ग्रीष्मा नारनवरे यांनी ५०० रोपटी तर संकेत बाबरिया यांनी २०० रोपटी घरी तयार करून ठेवली आहेत. येत्या १५ ऑगस्टला शहरात आंबा लागवडीचे महाअभियान राबविणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. शिवाय महापालिका व नासुप्र यांच्या सहकार्याने शहरात एक-दोन ठिकाणाची निवड करून आमराई वाढविण्याचे ध्येय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अशी झाली जाणीवपक्षी निरीक्षणासाठी या ग्रुपचे सदस्य एकदा सोनेगावच्या जंगलात गेले. या जंगलात २०० च्यावर आंब्याची झाडे आहेत व त्यावर ४०० च्या आसपास प्रजातीच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. आंब्याच्या विशाल वृक्षांवर जैवविविधता वाढत असल्याची गोष्ट त्यांच्या लक्षात आली. शिवाय भरतवन वाचविण्याच्या अभियानात सहभागी असल्याने याप्रमाणे एखादे वन फुलविण्याच्या विचारातून हे अभियान सुरू केल्याचे आकाशने सांगितले.संगोपनाची जबाबदारीजमीन आणि पाण्याची उपलब्धता पाहून वृक्षारोपण केले जाईल. त्यानंतर तीन वर्षे या वृक्षांचे संगोपन करतील, अशा पाच स्थानिक सदस्यांची निवड केली जाईल. फेन्सिंग किंवा ट्री-गार्ड लावून संगोपन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवण्याचे काम करण्यात येईल.

टॅग्स :Mangoआंबाnagpurनागपूर