मालमत्तेसाठी धाकटा भाऊ झाला ‘शकुनी’, मोठ्या भावावरच हल्ला

By योगेश पांडे | Updated: March 14, 2023 17:28 IST2023-03-14T17:26:10+5:302023-03-14T17:28:30+5:30

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Younger brother fatally attacked on elder brother over property dispute in nagpur | मालमत्तेसाठी धाकटा भाऊ झाला ‘शकुनी’, मोठ्या भावावरच हल्ला

मालमत्तेसाठी धाकटा भाऊ झाला ‘शकुनी’, मोठ्या भावावरच हल्ला

नागपूर : मालमत्तेच्या वादातून धाकट्या भावाकडून मोठ्या भावावर हल्ला करण्यात आला. यात मोठा भाऊ जखमी झाला आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून परिसरात याच प्रकरणाची चर्चा आहे.

संजय डोंगरे (६१, बदलापूर) यांना एकूण चार भाऊ आहेत. त्यातील एक भाऊ मोठा असून तोदेखील बाहेरगावी राहतो. त्यांचा लहान भाऊ प्रवीण हा कोरोनात खूप आजारी होता व त्यात त्याची नोकरी गेली. आजारपणामुळे तो काम करू शकत नाही. त्यामुळे वडिलोपार्जित घर त्याच्या नावावर करणे किंवा हिस्सा त्याला द्यावा असा विचार संजय यांनी अरविंद डोंगरे (४७) या भावाकडे मांडला.

अरविंदने लवकरच यवतमाळला शिफ्ट होणार असून त्यानंतर घराच्या चाव्या प्रवीणला देईल, असे आश्वासन दिले. दोन दिवसांअगोदर संजय हे त्यांचा भाऊ अरविंदकडे गेले व चाबी कधी देणार अशी विचारणा केली. त्याने सायंकाळपर्यंत त्यांना थांबवून घेतले, मात्र चाबी दिलीच नाही. अखेर संजय डोंगरे यांनी त्याला परत विचारणा केली असता अरविंदने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने संजय यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व लाकडी दांडा, बेल्टनेदेखील मारले.

इतकेच नव्हे तर संजय चालताना आधार म्हणून वापरत असलेल्या ॲल्युमिनियमच्या काडीनेदेखील त्यांना मारले. यात संजय बेशुद्ध पडले. नातेवाईकांनी प्रवीण या भावाकडे सोडले. अरविंद तेथेदेखील आला व त्याने परत घरी आल्यास मारण्याची धमकी दिली. मेडिकलमध्ये उपचार घेतल्यानंतर अखेर संजय यांनी अजनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अरविंद डोंगरेविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Younger brother fatally attacked on elder brother over property dispute in nagpur