शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

या... पोलीस ठाण्यात तुमचे स्वागत आहे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:47 IST

उंचावलेल्या भुवया, भेदक नजरा आणि आरडाओरड! प्रसंगी आरोपीचे कानशिलंग गरम करण्यात गुंतलेले पोलीस. खरखर करत गुन्ह्यांची सूचना देणारी सतत सुरू असलेली वॉकीटाकी अन् धावपळ करणारे खाकी वर्दीतील पोलीस, असे गुन्हे शाखा, पोलीस ठाण्यातील रोजचे रुक्ष वातावरण. आज मात्र गुन्हे शाखा, प्रशासन, मुख्यालय, ट्रॅफिक, विशेष शाखेसह सर्वच पोलीस ठाण्यातील वातावरण उत्साही होते. ठाण्यात येणाऱ्यांना ‘या तुमचे स्वागत आहे... ’असे बोल कानी पडत होते.

ठळक मुद्देपारंपरिक वेशातील महिला पोलीस अधिकारी अन् कर्मचारीठाण्यातील वातावरण हलकेफुलके : तक्रारदारांचे स्वागत, पुष्पगुच्छ अन् मिठाईही मिळाली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उंचावलेल्या भुवया, भेदक नजरा आणि आरडाओरड! प्रसंगी आरोपीचे कानशिलंग गरम करण्यात गुंतलेले पोलीस. खरखर करत गुन्ह्यांची सूचना देणारी सतत सुरू असलेली वॉकीटाकी अन् धावपळ करणारे खाकी वर्दीतील पोलीस, असे गुन्हे शाखा, पोलीस ठाण्यातील रोजचे रुक्ष वातावरण. आज मात्र गुन्हे शाखा, प्रशासन, मुख्यालय, ट्रॅफिक, विशेष शाखेसह सर्वच पोलीस ठाण्यातील वातावरण उत्साही होते. ठाण्यात येणाऱ्यांना ‘या तुमचे स्वागत आहे... ’असे बोल कानी पडत होते.खाकीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांऐवजी पारंपरिक साड्या आणि पातळात छान वेशभूषा करून आलेल्या महिला दिसत होत्या. सकाळी ९ वाजतापासून तो रात्री १० वाजेपर्यंत बहुतांश ठाण्यात स्वागत, अभिनंदन अन् गप्पाटप्पा असे हलकेफुलके वातावरण होते. तक्रार घेऊन येणाऱ्यांची आस्थेने विचारपूस होत होती. तेवढ्याच सहजपणे त्याची तक्रार, समस्या मार्गी लावण्याचेही प्रयत्न होत होते. मध्ये मध्ये शुभेच्छा देण्यासाठी येणाºया स्वयंसेवी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्या स्वागताचा, मिठाई देण्या-घेण्याचा आणि गप्पाटप्पांचाही छोटेखानी कार्यक्रम रंगत होता. अनेक पोलीस ठाण्यात केक कापले गेले अन् एकमेकांना मिठाई भरविण्यात आली.पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी आयुक्तालयात कार्यरत अधिकारी-कर्मचारी महिलांना एकत्रित करून त्यांचे अभिनंदन केले. त्यांना शुभेच्छा देऊन सकाळी कामकाजाला प्रारंभ झाला.गुन्हे शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर या दिवसभर पोलीस भरती अन् बैठकीत व्यस्त होत्या. सायंकाळी मात्र त्यांनी आपल्या कार्यालयात जाऊन सर्व महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकत्र केले. त्यांना मिठाई दिली. चहापाणीही झाले अन् कर्तव्यासोबतच पारिवारिक गप्पाटप्पाही झाल्या. विशेष शाखेत उपायुक्त स्मार्तना पाटील यांनीही असेच केले. प्रशासन विभागात उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांनीही आपल्या महिला सहकाºयांना शुभेच्छा अन् मिठाई दिली.शहरातील विस्कळीत वाहतुकीमुळे पोलिसांची वाहतूक शाखा नेहमीच वादग्रस्त चर्चेत अन् दडपणात असते. आज वाहतूक शाखेतील वातावरण हलकेफुलके होते. विविध चौकात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अधिकारी-कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देत होत्या. गुलाबपुष्प अन् मिठाईही देत होत्या. विशेष म्हणजे, रस्त्यावर बसून भाजीपाला, खेळणी, हातठेल्यावर विविध वस्तू विकणाऱ्या महिलांना महिला पोलीस गुलाबपुष्प देऊन ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’ असे सांगून आश्वस्त करीत होत्या. पोलीस नियंत्रण कक्षातही रोजच्याप्रमाणे गुन्ह्यांची, घटनांची माहिती देण्यासोबत शुभेच्छा देण्या-घेण्याचे प्रकार दिवसभर सुरू होते. भरोसा सेलमध्येही वातावरण उत्साही होते. विशेष म्हणजे, गुन्हे शाखेत महिला पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, एसीपी डॉ. अश्विनी पाटील, एसीपी रिना जनबंधू आणि त्यांच्या अधिनस्थ महिला अधिकारी-कर्मचारी पारंपरिक वेशभूषेत कार्यालयात कार्यरत होत्या.येलकेवार बनल्या सीताबर्डीच्या ठाणेदारशहराच्या मध्यवर्ती भागातील सीताबर्डी पोलीस ठाण्याचा कार्यभार आज एक दिवसासाठी सहायक पोलीस निरीक्षक छाया येलकेवार यांनी सांभाळला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत खराबे यांनी येलकेवार यांना महिला दिनाच्या निमित्ताने एक दिवसासाठी ठाणेदार म्हणून पदभार सोपविला. डे आॅफिसर म्हणून संगीता किल्लेवार यांनी जबाबदारी सांभाळली. स्वागत कक्षात रुखसार पठाण या महिला शिपायाने येणाऱ्या-जाणाऱ्यांचे स्वागत करून त्यांची वास्तपुस्त केली. दुकानदार आपला मोबाईल देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची तक्रार घेऊन दुपारी एक महिला सीताबर्डी ठाण्यात आली. तिला चहापाणी देऊन बसविण्यात आले. तेवढ्या वेळेत पोलिसांनी त्या मोबाईल दुकानदाराला ठाण्यात आणले. पोलीस ठाण्यात येताच त्या दुकानदाराने महिलेसमोर दिलगिरी व्यक्त करून तिचा मोबाईल तिला परत केला. एक दिवस का होईना, ठाणेदार म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर खूप आत्मविश्वास वाढला. आम्हीही पोलीस ठाणे सांभाळू शकतो,असा आत्मविश्वास विविध पोलीस ठाण्यात कार्यरत महिला-पोलीस अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.आयुक्तांची धंतोली ठाण्यात भेटपोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी गुरुवारी सकाळी ९.३० च्या दरम्यान धंतोली पोलीस ठाण्यात सदिच्छा भेट दिली. शहरातील ३० पोलीस ठाण्यांपैकी एकमात्र महिला ठाणेदार सीमा मेहंदळे धंतोली ठाण्यात आहेत. त्यांनी आयुक्तांचे स्वागत केले. तर आयुक्तांनी ठाणेदार मेहंदळेसह धंतोलीतील सर्व महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना महिला दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Policeपोलिस