शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्ड्यावर धाड : दोन पोलिसासह चौघांना अटक

By admin | Updated: April 7, 2017 23:23 IST

पोलिसांकडून पोलिसांसाठी चालविण्यात येणा-या जुगार अड्डयावर गिट्टीखदान पोलिसांनी शुक्रवारी दुपारी धाड घालून दोन

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ७ -  पोलिसांकडून पोलिसांसाठी चालविण्यात येणा-या जुगार अड्डयावर गिट्टीखदान पोलिसांनी शुक्रवारी दुपारी धाड घालून दोन पोलिसांसह चौघांना अटक केली. त्यांचे अर्धा डझनपेक्षा जास्त साथीदार पळून गेले.   
पोलिसांच्या छाप्यात रंगेहात पकडण्यात आलेल्यांमध्ये पोलिस कर्मचारी किस्सू उर्फ सुरेंद्र रामदास तिवारी(अवस्थीनगर), श्यामसुंदर इंद्रभान मिश्रा (झिंगाबाई टाकळी),  शिवशंकर नारायण शेट्टी (पोलिस लाईन टाकळी) आणि इसराईल इस्माईल पठाण (जाफरनगर) यांचा समावेश आहे. किस्सू तिवारी हा पोलीस खात्यात नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. 
पोलिस लाईन टाकळी परिसरातील पोलिस तलावाजवळ गेल्या अनेक दिवसांपासून हा जुगार अड्डा सुरू होता. त्याची माहिती  सहायक पोलिस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी शुक्रवारी दुपारी एक पोलीस पथक अड्डयावर पाठवले. मात्र, तेथे जुगार अड्डा सुरू नसल्याचे या पथकाने एसीपी वाघचौरे यांना कळविले. त्यानंतर पुन्हा दुपारी ४ च्या सुमारास गिट्टीखदानचे पोलीस पथक या अड्डयावर धडकले.  पोलिसांना पाहून जुगारात बसलेल्या काही पोलिसांसह त्यांच्या मित्रांनीही धूम ठोकली. पोलिसांनी पाठलाग करून चौघांना पकडले. हाती लागलेल्या जुगा-यात आपलेच भाउबंद असल्यामुळे कारवाईबाबत पोलीस संभ्रमात सापडले. त्यामुळे ही कारवाई उघड करावी की नाही, असा प्रश्न कारवाई करणारांना पडला. मात्र, वरिष्ठांनी रितसर कारवाईचे आदेश दिल्याने गिट्टीखदान ठाण्यात  मुंबई जुगार कायदा १२ अन्वये गुन्हा नोंदवून जुगा-यांना अटक करण्यात आली.
दिव्याखाली अंधार 
 जुगाराचा हा अड्डा पोलिसांकडूनच पोलिसांसाठी आणि पोलीस मित्रांसाठी चालविण्यात येतो. पूर्वी  हा अड्डा शहर नियंत्रण कक्षाच्या शेजारी चालायचा. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची नजर तिकडे वळल्याने हा अड्डा तेथून दुसºया एका ठिकाणी आता पोलीस तलावाजवळ भरविणे सुरू झाले. गावभरातील जुगार पकडण्यासाठी धावपळ करणाºया पोलीस कर्मचारी, अधिकाºयांचे बाजूलाच निवासस्थान आहे. त्यामुळे येथे २४ तास पोलिसांची वर्दळ असूनही या जुगार अड्ड्यावर पहिल्यांदा धाड घालण्यात आली हे विशेष!
दरम्यान, पोलिसांनी धाड घातल्यानंतर अनेक जुगारी पळून गेले. पकडण्यात आलेल्यांकडून  ७२ हजार ७४० रुपये जप्त करण्यात आले. पळून गेलेल्या जुगाºयांनी लाखोंची रक्कम सोबत नेल्याचीही चर्चा आहे.