याकूब मेमनचा नंबर २४ वा

By Admin | Updated: July 16, 2015 03:08 IST2015-07-16T03:08:52+5:302015-07-16T03:08:52+5:30

नागपूर कारागृहातील फाशी यार्डात स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत २३ जणांना फासावर लटकविण्यात आले.

Yakub Memon No. 24 | याकूब मेमनचा नंबर २४ वा

याकूब मेमनचा नंबर २४ वा

लोकमतविशेष
राज्यात फाशीला प्रारंभ नागपूर कारागृहातून

राहुल अवसरे  नागपूर
नागपूर कारागृहातील फाशी यार्डात स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत २३ जणांना फासावर लटकविण्यात आले. मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी याकूब मेमन यालाही याच कारागृहात फाशी दिली जाणार असल्याने त्याची ही फाशी २४ वी राहणार आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहाची स्थापना १८६४ मध्ये झाली.
नागपूर आणि येरवडा या दोन ठिकाणी फाशी देण्याची व्यवस्था आहे. येथील कारागृहात सर्वप्रथम नंदाल याला २५ आॅगस्ट १९५०, जकिया नारायण याला २२ सप्टेंबर १९५० , सीताराम नुहो याला २० फेब्रुवारी १९५०, सीताराम परय्या याला २६ जून १९५१, इरामन्न उपयोरसी याला ३ आॅगस्ट १९५१, भाम्या गोडा याला ४ आॅक्टोबर १९५१, सरदार याना याला १२ जानेवारी १९५२, नियतो कान्हू याला ३ आॅगस्ट १९५२, अब्दुल रहेमान इम्रानखान याला ५ आॅगस्ट १९५२, गणपत सखाराम याला २ सप्टेंबर १९५२, सखाराम फोकसू याला २४ सप्टेंबर १९५२, विनसा हरी याला १९ मार्च १९५३, जागेश्वर मारोती याला १९ जून १९५३, प्रेमलाल अमरीश याला ४ जुलै १९५३, लोटनवाला याला १५ सप्टेंबर १९५३, दयाराम बालाजी याला ३ फेब्रुवारी १९५६, अब्बासखान वजीरखान याला २८ आॅगस्ट १९५९, बाजीराव तवान्नो याला १५ फेब्रुवारी १९६०, श्यामराव पांडुरंग याला ८ जुलै १९७०, नाना गंगाजी याला १९ जानेवारी १९७३, मोरीराम शाद्याजी गोदान याला १७ एप्रिल १९७३ आणि वानखेडे बंधू यांना ५ नोव्हेंबर १९८४ रोजी फाशी देण्यात आली होती. त्यानंतर कुणालाही फासावर लटकविण्यात आले नाही.
स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी महाल भागातील स्वातंत्र्यवीर शंकर महल्ले यांना फाशी दिली होती. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत विविध हत्याकांडातील २३ जणांना फाशी देण्यात आली.
२५ आॅगस्ट १९५० रोजी पहिल्यांदा पंथेयाडी नंदाला नावाच्या आरोपीला फासावर लटकवण्यात आले होते. त्यानंतर १५ डिसेंबर १९५२ रोजी पुण्याच्या येरवडा कारागृहात पहिली फाशी एका आरोपीला देण्यात आली. स्वतंत्र्यानंतर राज्यात आतापर्यंत ५८ जणांना फाशी देण्यात आली.
याकूबला फाशी दिल्यानंतर याच कारागृहात वाडीतील एका बालिकेवरील बलात्कार-खुनातील आरोपी वसंता दुपारे यालाही फिशी दिली जाऊ शकते. या आरोपीचीही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यानेही राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला आहे.

Web Title: Yakub Memon No. 24

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.