नागपूर: नागपूर शहरात सिनेमा प्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. येत्या काही महिन्यांत, नागपूरमध्ये जगातील सर्वात मोठा सिनेमा स्क्रीन उभारला जाणार आहे. भारतातील मीडिया आणि एंटरटेनमेंट (एम अँड ई) क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) च्या पहिल्या २०२५ आवृत्तीचा समारोप झाला, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर घोषणा केली की नागपुरात लवकरच जगातील सर्वात मोठा सिनेमा स्क्रीन उभारल्या जाणार आहे. त्यांनी हा भारतीय सिनेमासाठी एक महत्त्वाचा क्षण आणि महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद पाऊल असल्याचे म्हटले.
स्क्रीनबद्दल तांत्रिक आणि लॉजिस्टिक तपशील जसे की त्याचा आकार, ठिकाण किंवा लाँच तारीख याविषयी अद्याप औपचारिकपणे जाहीर केलेले नाहीत, त्यात अत्याधुनिक ऑडिओ-व्हिज्युअल तंत्रज्ञान असण्याची अपेक्षा आहे आणि ते जागतिक चित्रपट महोत्सव, मोठ्या स्वरूपातील स्क्रीनिंग इत्यादींसाठी ठिकाण म्हणून काम करू शकते.
अभिषेक अग्रवाल जे 'कश्मीर फाइल्स' आणि 'वॅक्सिन वॉर' सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत आणि विक्रम रेड्डी जे यूव्ही क्रिएशन्ससोबत जोडलेले आहेत. हे दोघे हा प्रोजेक्ट पुढे नेतील. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोघांचे आभार मानले. नागपूरमध्ये उभारला जाणारा जगातील सर्वात मोठा सिनेमा स्क्रीन हे शहराच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या प्रकल्पामुळे नागपूर शहराच्या मनोरंजन क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होईल, ज्यामुळे प्रेक्षकांना एक अद्वितीय सिनेमा अनुभव मिळेल.