शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
3
हंटाव्हायर बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
4
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
5
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
6
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
7
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
8
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
9
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
10
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
11
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
12
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
14
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
15
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
16
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
17
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
18
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
19
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
20
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक परिचारिका दिन; देशातील पहिली ट्रान्सवूमन नर्स मायरा गुप्ताला नर्सिंगमुळे गवसला जगण्यातला अर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2023 08:00 IST

Nagpur News एखाद्या व्यक्तीच्या दुःखद काळात, त्रासाच्या प्रसंगी एक नर्स त्याची जी सेवाशुश्रूषा करते आणि त्यातून जे मानसिक समाधान तिला मिळते त्याला तोड नसते, असे मत मायरा गुप्ता या परिचारिकेने व्यक्त केले आहे.

वर्षा बाशू

नागपूर : ज्याला नोबेल प्रोफेशन म्हणून नावाजले गेले आहे, त्या नर्सिंगच्या क्षेत्राने मला जगण्यातला अर्थ समजावून दिला आहे. एखाद्या व्यक्तीच्या दुःखद काळात, त्रासाच्या प्रसंगी एक नर्स त्याची जी सेवाशुश्रूषा करते आणि त्यातून जे मानसिक समाधान तिला मिळते त्याला तोड नसते, असे मत मायरा गुप्ता या परिचारिकेने व्यक्त केले आहे. त्या नागपुरातील एका ख्यातनाम रुग्णालयात सीनियर ओ.टी. नर्स म्हणून कार्यरत आहेत. मायरा गुप्ता या देशातील पहिल्या ट्रान्सवूमन नर्स आहेत.

मायरा गुप्ता यांचा वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश हा २००७ साली झाला. त्यावेळी त्या विक्रम गुप्ता होत्या. आपल्या हसतमुख व मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी अल्पावधीतच रुग्ण व वैद्यकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांचे मन जिंकले. त्या काळात वरिष्ठ व सहकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांनी बंगळुरुला जाऊन नर्सिंगचे ट्रेनिंग घेतले व २०१८ पासून तेथील एका रुग्णालयात काम सुरू केले.

मायराच्या मते, एका रुग्णासाठी डॉक्टर हा अतिशय महत्त्वाचा व्यक्ती असतो. त्यांच्यापाठोपाठ एक नर्सही तितकीच महत्त्वाची असते. योग्यप्रकारे देखभाल करण्याची जी गरज एका रुग्णाला असते तशी देखभाल नर्स करते तेव्हा ती त्या व्यक्तीच्या आईसमान सांभाळ करत असते. वेदना सहन करत असलेल्या रुग्णाचा हात धरून त्याला शांत करणे, त्याची विचारपूस करणे व आपल्या स्मितहास्याने त्याच्या मनावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करणे हा नर्सच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या क्षेत्रात खूप संधी आहेत. मुला-मुलींनी व ट्रान्सजेंडर्सनी या क्षेत्राचा विचार करावा, असे मायरा यांना वाटते.

आठवणीतला प्रसंग

एका लहान मुलाच्या डोळ्यांचे ऑपरेशन होते. ते झाल्यानंतर काही दिवसांनी त्याच्या डोळ्यांवरची पट्टी काढायची होती. ती जेव्हा मी काढली तेव्हा त्याच्यासमोर त्याच्या घरातील मंडळी होती, पण डोळे उघडताच त्याने घरच्यांकडे न जाता माझ्या गळ्यात आपले चिमुकले हात टाकून जी घट्ट मिठी मारली.. ती माझ्यासाठी माझ्या कामाची मोठी पावती होती. तो एव्हरग्रीन अनुभव होता.

टॅग्स :Healthआरोग्य